मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट कोंबडी वडे

Photo of jhatpat kobdi vade by Seema jambhule at BetterButter
1114
1
0.0(0)
0

झटपट कोंबडी वडे

Jul-09-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट कोंबडी वडे कृती बद्दल

नाव जरी कोंबडी वडे असले तरी हा प्रकार मात्र शाकाहारी हां । हे वडे कोकण मधील पारंपरिक पदार्थ प्रकारात येतात , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , आणि पुर्ण कोकणात प्रत्येक हॅाटेल च्या मेन्यु मध्ये अगदी सहज बघायला मिळेल.

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी उडीद डाळ
  2. २-३ मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता
  3. २ वाटी तांदूळ पीठ
  4. तिखट, हळद, मीठ चवीनुसार
  5. तेल

सूचना

  1. उडदाची डाळ २-३ तास भिजत घाला. कमी वेळ असेल तर १ तास पण चालेल.
  2. डाळ, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता मऊ वाटून घ्या
  3. तांदळाच्या पिठात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घाला.
  4. आता वाटलेली डाळ घालून थालिपीठासारखे पीठ भिजवून घ्या.
  5. हाताने थापून वडे करा
  6. गरम तेलात वडे तळून घ्या
  7.  गरम नुसतेच सोलकढी, चिकन्/मटण रस्सा कसेही छान लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर