घेवर | Ghever Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Ghever by Deepa Gad at BetterButter
घेवरby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

15

0

घेवर recipe

घेवर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ghever Recipe in Marathi )

 • मैदा १ कप
 • तूप पाव कप
 • थंड दूध पाव कप
 • थंड पाणी जरुरीनुसार
 • बर्फाचे तुकडे ४-५
 • पाकासाठी :साखर १ कप
 • पाणी १/२ वाटी
 • ऑरेंज फूडकलर चिमूटभर
 • सजावटीसाठी बदाम तुकडे

घेवर | How to make Ghever Recipe in Marathi

 1. तुपात ४-५ बर्फाचे तुकडे घालून क्रिमी होईपर्यंत फेटत रहायचे
 2. थोडा मैदा,थंड दूध घालून हातानेच फेटत रहा
 3. नंतर थोडं थोडं मैदा, थंड पाणी घालून फेटत रहा, मिश्रणचे घावणेसाठी पीठ भिजवतो तेवढं पातळ बॅटर बनवा
 4. थोडावेळ ५ मिनिटे बॅटर फ्रीझमध्ये ठेवा
 5. दुसरीकडे साखर, पाणी घालून एकतारी पाक बनवा त्यात थोडा ऑरेंज फूड कलर घाला
 6. छोट पण खोलगट भांड (टोप) ठेऊन अर्ध भांड भरेल इतकं तेल टाका
 7. तेल तापलं की चमच्याने वरून बॅटरची धार सोडा म्हणजे मिश्रण तेलात टाकल्यावर जशी बुंदी पडते तशी दिसेल मधील भाग चमच्याने बाजूला करा
 8. अशाप्रकारे धार सोडा
 9. अशाप्रकारे दिसेल चमच्याचे टोकाने किंवा सुरीने मधील भाग बाजूला करा
 10. परत दुसरी धार मध्ये सोडा
 11. असे चार वेळा चमच्याने किंवा सुरीने मधला भाग मोकळा करून धार सोडावी
 12. लालसर रंग येईपर्यंत भाजावे व भाजल्यानंतर मध्ये सूरी घालून उभे पकडावे म्हणजे जास्तीचे तेल निथळून जाईल
 13. चाळणी खाली छोटे ताट ठेवून त्यावर चाळण ठेवावी व त्यावर घेवर ठेवावे
 14. वरून चमच्याने पाक सर्व बाजूला टाकावा
 15. वरून सजावटीसाठी बदामाचे काप घालावेत

My Tip:

तूप सामान्य तापमानात घेवून मगच बर्फात चांगलं फेटल पाहिजे तसेच घेवर साठी खोलगट भांड तळण्यासाठी घ्या म्हणजे छान होतील

Reviews for Ghever Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती