BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / घेवर

Photo of Ghever by Deepa Gad at BetterButter
366
9
0(0)
0

घेवर

Jul-09-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घेवर कृती बद्दल

ही स्वीट डिश खास राजस्थानमध्ये बनवली जाते

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • होळी
 • व्हेज
 • मध्यम
 • राजस्थान
 • फ्रायिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

 1. मैदा १ कप
 2. तूप पाव कप
 3. थंड दूध पाव कप
 4. थंड पाणी जरुरीनुसार
 5. बर्फाचे तुकडे ४-५
 6. पाकासाठी :साखर १ कप
 7. पाणी १/२ वाटी
 8. ऑरेंज फूडकलर चिमूटभर
 9. सजावटीसाठी बदाम तुकडे

सूचना

 1. तुपात ४-५ बर्फाचे तुकडे घालून क्रिमी होईपर्यंत फेटत रहायचे
 2. थोडा मैदा,थंड दूध घालून हातानेच फेटत रहा
 3. नंतर थोडं थोडं मैदा, थंड पाणी घालून फेटत रहा, मिश्रणचे घावणेसाठी पीठ भिजवतो तेवढं पातळ बॅटर बनवा
 4. थोडावेळ ५ मिनिटे बॅटर फ्रीझमध्ये ठेवा
 5. दुसरीकडे साखर, पाणी घालून एकतारी पाक बनवा त्यात थोडा ऑरेंज फूड कलर घाला
 6. छोट पण खोलगट भांड (टोप) ठेऊन अर्ध भांड भरेल इतकं तेल टाका
 7. तेल तापलं की चमच्याने वरून बॅटरची धार सोडा म्हणजे मिश्रण तेलात टाकल्यावर जशी बुंदी पडते तशी दिसेल मधील भाग चमच्याने बाजूला करा
 8. अशाप्रकारे धार सोडा
 9. अशाप्रकारे दिसेल चमच्याचे टोकाने किंवा सुरीने मधील भाग बाजूला करा
 10. परत दुसरी धार मध्ये सोडा
 11. असे चार वेळा चमच्याने किंवा सुरीने मधला भाग मोकळा करून धार सोडावी
 12. लालसर रंग येईपर्यंत भाजावे व भाजल्यानंतर मध्ये सूरी घालून उभे पकडावे म्हणजे जास्तीचे तेल निथळून जाईल
 13. चाळणी खाली छोटे ताट ठेवून त्यावर चाळण ठेवावी व त्यावर घेवर ठेवावे
 14. वरून चमच्याने पाक सर्व बाजूला टाकावा
 15. वरून सजावटीसाठी बदामाचे काप घालावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर