राजगिरा लहिपीठ थालीपीठ | Rajgira Lahipith Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira Lahipith Thalipith recipe in Marathi,राजगिरा लहिपीठ थालीपीठ, Vaishali Joshi
राजगिरा लहिपीठ थालीपीठby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

राजगिरा लहिपीठ थालीपीठ recipe

राजगिरा लहिपीठ थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira Lahipith Thalipith Recipe in Marathi )

 • राजगिरा लाही २ कप
 • बटाटा १
 • शेंगदाणे कूट ३-४ चमचे
 • किसलेले पनीर ३-४ चमचे
 • आल किसलेल १ चमचा
 • मिर्ची जीर ठेचा १ चमचा
 • कोथिंबीर
 • लिंबू रस १ चमचा
 • तिखट आवडीप्रमाणे
 • शेंदोमीठ (उपवासाचे मीठ )

राजगिरा लहिपीठ थालीपीठ | How to make Rajgira Lahipith Thalipith Recipe in Marathi

 1. बटाटा उकडून घ्या , राजगिरा लाही चे पीठ मिक्सर मधे करुन घ्या आणि पनीर पण किसुन ठेवा
 2. परातीत बारीक़ केलेले राजगीरा लाही चे पीठ घ्या त्यात बटाटा स्मैश करुन घाला , दाणे कूट , किसलेल पनीर , आल किस , मिर्ची जीर ठेचा , तिखट ,मीठ , लिंबू रस , कोथिंबीर घालून मिक्स करुन गोळा तयार करुन ठेवा
 3. छोटे गोळे करुन प्लास्टिक पेपर वर थालीपीठ थापुन घ्या आणि गरम तव्यावर तूप सोडून थालीपीठ दोन्ही बाजूने भाजून घ्या . आवडीनुसार दही किंवा उपवासाच्या गोड लोणच्या बरोबर खायला द्या

Reviews for Rajgira Lahipith Thalipith Recipe in Marathi (0)