कोबी थालिपीठाचा पीझ्झा | Cabbage thalipith pizza Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  10th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Cabbage thalipith pizza recipe in Marathi,कोबी थालिपीठाचा पीझ्झा, deepali oak
कोबी थालिपीठाचा पीझ्झाby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

1

कोबी थालिपीठाचा पीझ्झा recipe

कोबी थालिपीठाचा पीझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cabbage thalipith pizza Recipe in Marathi )

 • बाजरी पीठ १ वाटी
 • ज्वारी पीठ १ वाटी
 • चणाडाळ पीठ १ वाटी
 • गहुपीठ १ वाटी
 • तांदळाचे पीठ १ वाटी
 • कोबी किसून २ वाटी
 • आले लसुण मीरची पेस्ट ३ चमचे
 • गाजर १ किसुन
 • शिमला मीरची एक
 • बिट १ किसून
 • मशरूम ऐच्छिक ३/४ चीरून
 • तिखट मीठ
 • चीलीफ्लेक्स
 • पिझ्झा स्प्रेड
 • टोमॅटोसाॅस
 • चीज कयुब ४
 • बटर एक वाटी
 • कोथिंबीर एक वाटी

कोबी थालिपीठाचा पीझ्झा | How to make Cabbage thalipith pizza Recipe in Marathi

 1. कढईत जरा बटर घेऊन त्यात एक चमचा पेस्ट घाला
 2. त्यात किसलेले गाजर बिट शिमला मीरची मशरूम घालून परता
 3. तिखट मीठ व चीलीफ्लेक्स घालून परता
 4. भाज्या जरा कमी शिजवून बाजूला ठेवा
 5. परातित सगळी पीठे किसलेला कोबी व कोथिंबीर घालून एकत्र करा
 6. तिखट मीठ व ऊरलेली पेस्ट २ चमचे घालून पीठ मळुन घ्या
 7. आता पीठाचे जाडसर थालिपीठ थापा
 8. पॅन मध्ये बटर सोडुन खरपूस भाजा
 9. थालिपीठ भाजताना एक साईड जरा कमी खरपूस भाजा व एक साईड जास्त भाजुन घ्या
 10. आता जास्त भाजलेली साईड वर पीझ्झा स्प्रेड पसरवा साॅस पसरवा
 11. आता बनवलेली भाजी पसरवा
 12. पॅनमध्ये पुन्हा जरा बटर घालून पीझ्झा त्यात ठेवा
 13. जीज वितळले कि कापुन खाऊ घाला

My Tip:

तुम्ही कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता. भाजणीचे पीठ असेल तर ऊत्तमच पण कोणतेही पीठे वापरू शकता

Reviews for Cabbage thalipith pizza Recipe in Marathi (1)

samina shaikh4 months ago

wow..new dish
Reply