मशरूम रोल | Mashroom roll Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mashroom roll recipe in Marathi,मशरूम रोल, deepali oak
मशरूम रोलby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

मशरूम रोल recipe

मशरूम रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mashroom roll Recipe in Marathi )

 • दोन वाटी गव्हाचे पीठ
 • एक वाटी मैदा ऐच्छिक
 • एक वाटी तांदूळ पीठ
 • १ गाजर किसुन
 • १ शिमला मिर्ची चीरून
 • १ बिट किसुन
 • १ पाकिट मशरुम
 • १ कांदा चीरून
 • १ टोमॅटो चीरून
 • कोथिंबीर १ वाटी
 • पुदिना
 • किसलेले खोबरे १ चमचा
 • हिरव्या मीरच्या २/३
 • आले जरासे
 • लसुन २ पाकळी
 • आले लसुण पेस्ट १ चमचा
 • बटर १ चमचा
 • तेल
 • तिखट मीठ व सबजी मसाला १ ममचा
 • मेयोनीज
 • टोमेटोसाॅस
 • शेजवान चटणी
 • अंडी ५/६
 • लिंबुरस १ चमचा

मशरूम रोल | How to make Mashroom roll Recipe in Marathi

 1. परातीत पीठे मीठ घालून मीक्स करा
 2. छान मळुन बाजूला झाकुन ठेवा
 3. पॅन मध्ये बटर घालून त्यात आले लसुण पेस्ट कांदा टोमॅटो परतुन घ्या
 4. त्यात तिखट मीठ सबजी मसाला घाला
 5. आता ह्यामध्ये भाज्या घालून परतुन घ्या
 6. भाज्या वाफेवर शिजल्या कि जरा कोथिंबीर घालून बाजूला ठेवा
 7. आता मीक्सर मध्ये कोथिंबीर व पुदिना मीरची आले व लसुण मीठ लींबुरस व जरा पाणी घालून पातळ चटणी बनवा
 8. अंडी फेटुन मीठ घालून तयार ठेवा व चायनीज चटणी पण वाटित काढून घ्या
 9. आता कणकेची पातळ पोळी लाटुन तव्यावर एक बाजूने कमी व एक बाजूने जास्त भाजुन घ्या
 10. गैस बारिक करून जास्त भाजलेल्या पोळीला अंड्याचे फेटलेले मीश्रण ओतुन पसरवा
 11. आता जरासे तेल घालून अलगद हे पलटवा व ओमलेट शिजु द्या
 12. आता हि पोळी ताटात घेऊन ओमलेट वर मेयोनीज शेजवान चटनी व पुदिना चटणी पसरवा
 13. एका बाजूला भाजी घाला
 14. वरून टोमॅटोसाॅस घाला (ऐच्छिक)
 15. आता ह्याचा रोल करून छोटे छोटे तुकडे कापा

Reviews for Mashroom roll Recipe in Marathi (0)