Photo of Mashroom  roll by deepali oak at BetterButter
583
2
5.0(0)
0

Mashroom roll

Jul-10-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन वाटी गव्हाचे पीठ
  2. एक वाटी मैदा ऐच्छिक
  3. एक वाटी तांदूळ पीठ
  4. १ गाजर किसुन
  5. १ शिमला मिर्ची चीरून
  6. १ बिट किसुन
  7. १ पाकिट मशरुम
  8. १ कांदा चीरून
  9. १ टोमॅटो चीरून
  10. कोथिंबीर १ वाटी
  11. पुदिना
  12. किसलेले खोबरे १ चमचा
  13. हिरव्या मीरच्या २/३
  14. आले जरासे
  15. लसुन २ पाकळी
  16. आले लसुण पेस्ट १ चमचा
  17. बटर १ चमचा
  18. तेल
  19. तिखट मीठ व सबजी मसाला १ ममचा
  20. मेयोनीज
  21. टोमेटोसाॅस
  22. शेजवान चटणी
  23. अंडी ५/६
  24. लिंबुरस १ चमचा

सूचना

  1. परातीत पीठे मीठ घालून मीक्स करा
  2. छान मळुन बाजूला झाकुन ठेवा
  3. पॅन मध्ये बटर घालून त्यात आले लसुण पेस्ट कांदा टोमॅटो परतुन घ्या
  4. त्यात तिखट मीठ सबजी मसाला घाला
  5. आता ह्यामध्ये भाज्या घालून परतुन घ्या
  6. भाज्या वाफेवर शिजल्या कि जरा कोथिंबीर घालून बाजूला ठेवा
  7. आता मीक्सर मध्ये कोथिंबीर व पुदिना मीरची आले व लसुण मीठ लींबुरस व जरा पाणी घालून पातळ चटणी बनवा
  8. अंडी फेटुन मीठ घालून तयार ठेवा व चायनीज चटणी पण वाटित काढून घ्या
  9. आता कणकेची पातळ पोळी लाटुन तव्यावर एक बाजूने कमी व एक बाजूने जास्त भाजुन घ्या
  10. गैस बारिक करून जास्त भाजलेल्या पोळीला अंड्याचे फेटलेले मीश्रण ओतुन पसरवा
  11. आता जरासे तेल घालून अलगद हे पलटवा व ओमलेट शिजु द्या
  12. आता हि पोळी ताटात घेऊन ओमलेट वर मेयोनीज शेजवान चटनी व पुदिना चटणी पसरवा
  13. एका बाजूला भाजी घाला
  14. वरून टोमॅटोसाॅस घाला (ऐच्छिक)
  15. आता ह्याचा रोल करून छोटे छोटे तुकडे कापा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर