स्वीट फ्लॉवर | Sweet Flower Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Flower recipe in Marathi,स्वीट फ्लॉवर, Deepa Gad
स्वीट फ्लॉवरby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

8

0

स्वीट फ्लॉवर recipe

स्वीट फ्लॉवर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Flower Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ दीड कप
 • खायचा सोडा ३/४ च
 • ऑरेंज, येल्लो फूड कलर
 • पाणी जरुरीनुसार
 • तेल ५ च
 • तेल तळण्यासाठी
 • सजावटीसाठी काजू, बदाम
 • पाकासाठी:
 • साखर ३/४ कप
 • पाणी १/२ कप

स्वीट फ्लॉवर | How to make Sweet Flower Recipe in Marathi

 1. एकीकडे १ कप गव्हाचे पीठ, १/२ च खायचा सोडा, तेल ३ च ऑरेंज फूड कलर घालून मिक्स करा
 2. दुसरीकडे १/२ कप गव्हाच्या पिठात खायचा सोडा १/४ च, तेल २ च, येल्लो फूड कलर घालुन मिक्स करा
 3. दोन्ही पीठे वेगवेगळी आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मळा
 4. ऑरेंज कलरच्या पिठाचे समान ६ गोळे करा व येल्लो पिठाचेही ६ समान गोळे करा
 5. ऑरेंज कलर च्या पिठाची पारी बनवून त्यात येल्लो गोळा घालून बंद करा
 6. असे सर्व गोळे करून घ्या
 7. साखर, पाणी घालून एकतारी पाक बनवा
 8. तेल तापत ठेवा
 9. बनवलेले गोळे घेऊन धारदार सुरीने अर्धवट तीन बाजुनी चिरा द्या म्हणजे फुलांचा आकार तयार होईल
 10. असे सर्व करून घेऊन तेलात तळा, तळताना पाकळ्यांची बाजू वर करा त्यावर झाऱ्याने तेल उडवत रहा म्हणजे पाकळ्या सुट्या होतील
 11. तळल्यानंतर पाकात घालुन वर पाकळ्या बुडतील अशा किंवा पाकळ्यांवर चमच्याने पाक घालत रहा
 12. पाक मुरला की काढून डिशमध्ये घ्या व वरून बदामाचे काप घाला, ड्रायफ्रूटसने सजवा

My Tip:

यात तुम्ही आवडीचा फूड कलर घालून फ्लॉवर बनवू शकता तसेच गव्हाच्या पीठाऐवजी मैदा घेऊ शकता

Reviews for Sweet Flower Recipe in Marathi (0)