पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गुलाब मोमोज | Healthy wheat flour Rose momos Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Healthy wheat flour Rose momos recipe in Marathi,पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गुलाब मोमोज, Rohini Rathi
पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गुलाब मोमोजby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गुलाब मोमोज recipe

पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गुलाब मोमोज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Healthy wheat flour Rose momos Recipe in Marathi )

 • आवरणासाठी
 • गव्हाचे पीठ एक कप
 • दोन टेबल स्पून मैदा
 • मीठ चवीनुसार
 • तेल एक टेबल्स्पून
 • बीट प्युरी अर्धा कप
 • सारणासाठी
 • एक टेबल स्पून तेल
 • एक टेबल्स्पून किसलेला आल
 • एक टेबल्स्पून लसूण पेस्ट
 • बारीक किसलेला कोबी एक कप
 • बारीक किसलेले गाजर अर्धा कप
 • बारीक चिरलेली शिमला मिरची पाव कप
 • बारीक चिरलेला कांदा एक
 • चवीनुसार मीठ
 • बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन
 • काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून

पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गुलाब मोमोज | How to make Healthy wheat flour Rose momos Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम एका ताटात गव्हाचे पीठ मैदा मीठ व तेल एकत्र करून घ्यावे
 2. बीट प्युरी च्या साह्याने कणिक मळून घ्यावे
 3. सारण बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून घ्यावे
 4. त्यात सर्वप्रथम कांदा व किसलेला कोबी व गाजर परतून घ्यावे
 5. नंतर शिमला मिरची घालून घ्यावी
 6. काळी मिरी व चवीनुसार मीठ घालून मिश्रण परतून घ्यावे
 7. नंतर एका ताटात काढून थंड करून घ्यावे
 8. तयार पिठाची पोळी लाटून घ्यावी
 9. कटरच्या साह्याने गोल छोट्या 3 पुऱ्या कापून घ्याव्यात
 10. तयार पुऱ्या एकावर एक ठेवून सारण मध्यभागी म्हणून घ्यावे
 11. वरील पुऱ्या अर्ध्या दुमडून घ्यावे
 12. एका बाजूने पकडून गोल फिरवून गुलाब बनवून घ्यावे
 13. अशाप्रकारे सर्व गुलाब मोमोज बनवून घ्यावे
 14. कढईत पाणी गरम करून वरती चाळणी ठेवून त्यावर तेलाने क्रिस करून घ्यावे
 15. तयार मोमोज चाळणीवर ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्यावे
 16. व्यवस्थित पकडल्यानंतर टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

गव्हाच्या पिठाचे मैदा ही वापर करू शकता

Reviews for Healthy wheat flour Rose momos Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo