मिक्स पीठांचे कांदा वडे | Multigrain Flour Onion Vade Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Multigrain Flour Onion Vade recipe in Marathi,मिक्स पीठांचे कांदा वडे, Sujata Hande-Parab
मिक्स पीठांचे कांदा वडेby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  2

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

मिक्स पीठांचे कांदा वडे recipe

मिक्स पीठांचे कांदा वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Multigrain Flour Onion Vade Recipe in Marathi )

 • नाचणी किंवा रागी पीठ - १/२ कप
 • बाजरीचे पीठ - १/२ कप
 • तांदळाचे पीठ - १/२ कप
 • गव्हाचे पीठ - १/२ कप
 • उडीद डाळ पीठ - 2 टेबलस्पून
 • कांदा मध्यम - 3 चिरून
 • हिरव्या मिरच्या - 3-4 जाडसर चिरलेली
 • लाल तिखट - १ टीस्पून 
 • जिरेपूड - १/२ टेबलस्पून
 • धना पावडर - १ टेबलस्पून
 • मेथी पावडर - १/२ टिस्पून
 • हिंग - १/४ टीस्पून
 • स्वादानुसार मीठ 
 • पीठ मळण्यासाठी आवश्यक पाणी
 • तळण्यासाठी तेल

मिक्स पीठांचे कांदा वडे | How to make Multigrain Flour Onion Vade Recipe in Marathi

 1. कांदा आणि हिरव्या मिरच्यां मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्याव्यात. आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला.
 2. एका वाडग्या मध्ये सर्व पीठे मिक्स करावीत. त्यात तयार कांदा-मिरची पेस्ट घालावी; त्यात हिंग, जिरे, धणे पूड, लाल तिखट, मेथी पावडर आणि मीठ घालावे.
 3. एका वेळी थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. एक किंवा दोन तासासाठी झाकून बाजूला ठेवा.
 4. कढईत तेल तापवा.
 5. हाताला तेल लावून मळलेल्या कणकेचे छोटे गोळे करून घ्या.
 6. पोळपाटावर किंवा प्लेटवर मलमल कापड किंवा क्लिंग रॅप ठेवा. थोडे पाणी किंवा तेला तेल लावा.
 7. एक गोळा ठेवा आणि सर्व बाजूंनी समान रीतीने हाताच्या बोटानी पसरवून घ्या. थोडे जाड असावे.
 8. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि फुगेपर्यंत मध्यम ज्योती वर तळून घ्या.
 9. कोणत्याही करी, भाजी किंवा गरम चहा बरोबर सर्व्ह करा.

Reviews for Multigrain Flour Onion Vade Recipe in Marathi (0)