साबुदाणा बटाटा पापडी | Sabhudana potato papad Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabhudana potato papad recipe in Marathi,साबुदाणा बटाटा पापडी, आदिती भावे
साबुदाणा बटाटा पापडीby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

1

0

साबुदाणा बटाटा पापडी recipe

साबुदाणा बटाटा पापडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabhudana potato papad Recipe in Marathi )

 • साबुदाणा-2 वाटी
 • बटाटा -3
 • मीठ चवीनुसार
 • हिरवी मिरचिची पेस्ट आवडीनुसार
 • जिरे पावडर -2 चमचे

साबुदाणा बटाटा पापडी | How to make Sabhudana potato papad Recipe in Marathi

 1. साबुदाणा भाजून घ्यावा. बटाटे शिजवून घ्यावे. साबुदाणा गार झाला की त्याचे मिक्सर मध्ये पिठ करावे. बटाटे गार झाले की mash करून घ्यावे, त्यात साबुदाणा पीठ , मिरची पेस्ट , मीठ , जिरा पावडर घालावी. अर्धी वाटी पाणी घालून गॅस वर शिजवून घ्यावे. शिजवताना घोटत रहावे. पळी ने घालता येईल इतपत मिश्रण असावे. प्लास्टिक कागदावर पळीने गोल गोल असे मिश्रण घालावे , सांडगे घालतो तसे. उन्हात वाळवून घ्यावे. वाळल्यावर तळून घेऊन खावेत. साबुदाणा पिठाची पापडी तयार.

My Tip:

उपवासाला पण चालते, लाल तिखट घालून पण करता येते.

Reviews for Sabhudana potato papad Recipe in Marathi (0)