मस्का चस्का मसाला बन्स | Maska chaska masala buns Recipe in Marathi

प्रेषक Garima Yadav  |  12th Jul 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • Maska chaska masala buns recipe in Marathi,मस्का चस्का मसाला बन्स, Garima Yadav
मस्का चस्का मसाला बन्सby Garima Yadav
 • तयारी साठी वेळ

  2

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

5

1

मस्का चस्का मसाला बन्स recipe

मस्का चस्का मसाला बन्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Maska chaska masala buns Recipe in Marathi )

 • 3 कप गहूचे पीठ
 • 1 टेबलस्पून इंस्टंट यीस्ट
 • 2 टेबलस्पून साखर
 • 1 टीस्पून मीठ
 • 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
 • 1 1/4 कप कोमट दूध
 • 2 1/2 टेबलस्पून तेल
 • 1 मध्यम आकाराचे कांदा बारीक चिरून
 • 7-8 लसूण पाकळ्या बारीक चिरून
 • 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • 2 टीस्पून जिरे
 • 2 टीस्पून बडीशेप
 • 1 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
 • 1 टेबलस्पून कढीपत्ता बारीक चिरून
 • 1 टीस्पून मिंट पावडर
 • 1 टेबलस्पून बटर (ब्रश करता)
 • सजावटीसाठी साहित्य-
 • 1 लहान कांदा चिरलेला
 • इच्छेनुसार चिल्ली फ्लेक्स
 • इच्छेनुसार कोथिंबीर पाने

मस्का चस्का मसाला बन्स | How to make Maska chaska masala buns Recipe in Marathi

 1. बन्स बनवण्यासाठीच्या पायऱ्या
 2. एका मध्यम आकाराच्या वाडगामध्ये, कोमट दूध, साखर आणि यीस्टचे मिश्रण तयार करा, दहा मिनिटे विक्षांती नाहीतर फेस येऊ पर्यंत ठेवा.
 3. एका वाडग्यात गव्हाचे पीठ, मीठ, बेकिंग पावडर घालून चांगले नीट ढवळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.
 4. एकदा खमीर मिश्रणला फेस आले कि त्यात तेल घालावे आणि मिसळून तयार केलेले पिठ मिश्रण घालावे.
 5. आता बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, लसूण, जीरे, बडीशेप आणि पुदीना पावडर घालून सर्व काही चांगले मिक्स करावे.
 6. पीठ खूप चिकट होणार हाताला तेल लावून घ्या पीठ चांगले मळून घ्या, नंतर ओले कापडाने झाकुन दोन तासासाठी ठेवा.
 7. 2 तासांनंतर पीठ दुप्पट होनार 1 ते 2 मिनीटे परत पीठाला मकुन घ्यावे.
 8. पीठाचे 10 भाग करून , गोळे तयार करा.
 9. बेकिंग ट्रे ला लोणी लावून तयार गोळे 20 मिनिटे ठेवावे.
 10. ओव्हन 200°c वर प्रीहीट करावे.
 11. तयार गोल्या वर लोणी लावून कांदा, चिल्ली फ्लेक्स आणि हिरवी कोथिंबीर घालून आणि 15-20 मिनिटे बेक करा.
 12. मासका चस्का मसाला बन्स तयार आहे गरम चहाबरोबर सर्व्ह करावे.

Reviews for Maska chaska masala buns Recipe in Marathi (1)

deepali oak4 months ago

रेसीपी काहींचं कळाली नाही प्लिज नीट एडीट करा.वंगण ,आंबे ???
Reply

Cooked it ? Share your Photo