तांदळाच्या पिठाचा उकड उपमा | Steam Rice Upma Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Steam Rice Upma recipe in Marathi,तांदळाच्या पिठाचा उकड उपमा, Poonam Nikam
तांदळाच्या पिठाचा उकड उपमाby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

तांदळाच्या पिठाचा उकड उपमा recipe

तांदळाच्या पिठाचा उकड उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Steam Rice Upma Recipe in Marathi )

 • तांदळाच पिठ १ वाटी
 • कांदा १
 • हिरवी मिरची २-३
 • कोथंबीर
 • आल छोटा तुकडा
 • लसुण ४-५
 • जीर
 • मोहरी
 • हिंग
 • कढिपत्ता
 • मीठ
 • तेल

तांदळाच्या पिठाचा उकड उपमा | How to make Steam Rice Upma Recipe in Marathi

 1. आल लसुन कोथंबीर पेस्ट करुन घ्या
 2. गँसवर कढईत २ चमचे तेल घाला गरम कराआता यात आललसुप्न कोथंबीर पेस्ट घालुन परता
 3. आता १ ग्लास पाणि ओतुन मीठ टाकुन गरम करा
 4. गरम झाल्यावर तांदळाच पिठ टाका
 5. ढवळुन उकडुन घ्या
 6. २ मीनीट झाकन ठेवा
 7. दोन मीनीटा नंतर मळुन घ्या
 8. आता त्याचे गोळे बनवुन ईडलिचा आकारा द्या
 9. आता हे गोळे पुन्हा उकड ठेवा मोदक उकळत ठेवतो तसे
 10. उकड या प्रमाणे दिसतील
 11. आता कढई मद्धे तेल २ चमचे ओतुन मोहरु ,जीर,हिंग कढिपत्याची फोडणी द्या
 12. कांदा परतुन घ्या त्यात हिरवी मिरची टाकुन परतुन घ्या हिरवी मिरची आवश्यक वाटल्यास वापरा
 13. चिमुठर मिठ वापरा ,आपण उकडताना मिठाचा वापर केला आहे , ,मिक्स करुन वरुन तांदळाची उकड टाका परतुन मिक्स करा.
 14. खायला सर्व करा

Reviews for Steam Rice Upma Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo