मिक्स पिठांचे लाडू | MULTIGRAIN LADDU Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  12th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • MULTIGRAIN LADDU recipe in Marathi,मिक्स पिठांचे लाडू, जयश्री भवाळकर
मिक्स पिठांचे लाडूby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

मिक्स पिठांचे लाडू recipe

मिक्स पिठांचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MULTIGRAIN LADDU Recipe in Marathi )

 • 1/2 कप मुगाच पिठ
 • 1/2  कप चण्याच्या डाळी च पिठ/बेसन
 • 1/2 कप उडीद डाळी च पिठ
 • 2 वाट्या साखर
 • 2 कप साजूक तूप
 • 2 चमचा वेलची पावडर
 • 1 कप पाणी

मिक्स पिठांचे लाडू | How to make MULTIGRAIN LADDU Recipe in Marathi

 1. सगळी पिठ एकत्र करून मुठ्ठी बंद असे तुपाचे मोहन घाला अंदाजे 4 चमचे तूप लागेल.
 2. आता थोडं स पाणी घालून थोडं घट्टसर पिठ मळून घ्या .
 3. .ह्या पिठा चे छोटे छोटे  मुटकुळे बनवा.
 4. हे मुटकुळे थोड्या तुपात गुलाबी तळून घ्या.
 5. मुटकुळे थंड झाल्यावर हातांनी कुस्करून घ्या आणि मिक्सर मधे बारीक वाटून घ्या.
 6. हे वाटलेले पिठ 2 चमचा तुपात पुन्हा थोडं परतून घ्या.
 7. एकी कडे पातेल्यात 2 कप साखरेत 1/2 कप पाणी घाला आणि साखर विरघळू  द्या ,हा कच्चा पाक झाला ह्याचे 2-3  चमचे पाक तैयार पिठात नीट मिक्स करा.
 8. आता उरलेल्या पाका चा गोळी बंद पाक करून पिठात नीट मिक्स करा.
 9. कच्चा पाक घातल्या मुळे गोळीबंद पाका ची काही गफलत होत नाही हवा तसा मऊ लाडू बनतो.
 10. हे मिश्रण थोडं कोंबट असतानाच लाडू वळून घ्या वर एक काजू चा तुकडा सजावटी साठी लावा.
 11. पौष्टिक असे मिक्स पिठांचे लाडू तैयार आहेत.

My Tip:

आवडत असल्यास ड्रायफ्रूटस ची भरड लाडूंच्या मिश्रणात घालू शकता.

Reviews for MULTIGRAIN LADDU Recipe in Marathi (1)

Mukta Deolalikar7 months ago

एकदम बढ़िया है और पौष्टिक भी:ok_hand::thumbsup::thumbsup:
Reply
जयश्री भवाळकर
7 months ago
Thank you so much.