कांदा टोमॅटो उत्तपा | Onion Tomato Uttapa Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onion Tomato Uttapa recipe in Marathi,कांदा टोमॅटो उत्तपा, Bharti Kharote
कांदा टोमॅटो उत्तपाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

कांदा टोमॅटो उत्तपा recipe

कांदा टोमॅटो उत्तपा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion Tomato Uttapa Recipe in Marathi )

 • दोन वाटी तांदुळाचे पीठ
 • एक वाटी बेसन पीठ
 • अर्धीवाटी मक्याचे पीठ
 • दोन वाटी ताक
 • एक कांदा चिरलेला
 • एक टोमॅटो चिरलेला
 • एक वाटी कोथिंबीर चिरून
 • एक चमचा लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • दोन चमचे ग्रीन चटणी
 • तेल
 • पाणी आवश्यकतेनुसार

कांदा टोमॅटो उत्तपा | How to make Onion Tomato Uttapa Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात सर्व पीठं घ्या त्यात मीठ ताक पाणी घालून बॅटर तयार करा. .
 2. 15 मी. बाजूला ठेवा. .
 3. तोपर्यंत कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घ्या. .
 4. गॅस वर नाॅन स्टीक तवा ठेवा
 5. त्या वर तेल टाकून पळीने बॅटर पसरवा..उत्तपा साठी जाडसर बॅटर घाला. .
 6. त्या वर हाताने कांदा टोमॅटो पसरवा..लाल तिखट भूरभूरवा. .कोथिंबीर घाला. .
 7. सर्व कडांनी तेल सोडून चांगले खमंग भाजून घ्या. .दूसरया बाजूंने पण तसेच भाजून घ्या. .
 8. त्या वर ग्रीन चटणी घाला. .आणि गरमागरम खायला दया. ..

Reviews for Onion Tomato Uttapa Recipe in Marathi (0)