क्रिस्पी कसुरी मेथी पुरी | Crispy Kasuri Methi Puri Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Crispy Kasuri Methi Puri recipe in Marathi,क्रिस्पी कसुरी मेथी पुरी, Sujata Hande-Parab
क्रिस्पी कसुरी मेथी पुरीby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

6

0

क्रिस्पी कसुरी मेथी पुरी recipe

क्रिस्पी कसुरी मेथी पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy Kasuri Methi Puri Recipe in Marathi )

 • मैदा - ३ कप किंवा ५०० ग्राम्स
 • रवा - १/२ कप
 • कसुरी मेथी - ३ टेबलस्पून (थोडी कुस्करून घेतलेली)
 • ओवा - १ टेबलस्पून जाडसर वाटलेला
 • साखर - २ टेबलस्पून
 • काळीमिरी पावडर - १ १/२ टीस्पून
 • मीठ -चवीनुसार
 • तेल - ३ कप तळण्यासाठी
 • गरम तूप - ४-५ टेबलस्पून मोहनासाठी
 • पाणी पीठ मळण्यासाठी जसे लागेल तसे 

क्रिस्पी कसुरी मेथी पुरी | How to make Crispy Kasuri Methi Puri Recipe in Marathi

 1. एका छोट्या वाडग्यात मैदा घ्यावा. थोडे थोडे करून तूप टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. तूप एकदम टाकू नये. बाजूला ठेवावे.
 2. एका परातीमध्ये मैदा, रवा, साखर, कुस्करलेली कसुरी मेथी, जाडसर वाटलेला ओवा, मीठ आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करावे.
 3. पिठाच्या मधोमध होल करून त्यात गरम तुपाचे मोहन टाकावे .
 4. चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे . थोडे थंड झाल्यावर हळू हळू दोन्ही हातानी पीठ चांगले कुस्करून घ्यावे.
 5. त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ जाडसर असावे. झाकून २०-२५ मिनिटांसाठी बाजूला ठेवावे.
 6. मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून त्याची मोठी पोळी लाटावी.
 7. त्याला फोर्क किंवा काटा चमच्याच्या मदतीने सगळीकडे टोचे मारून घ्यावेत जेणेकरून पुरी तळल्यानंतर फुलणार नाही.
 8. एका ३-४ इंच गोल कटर ने छोट्या पुऱ्या कापून घ्याव्यात.
 9. असा प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घ्याव्यात.
 10. एका कढईत तेल गरम करून कमी-मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळुन घ्याव्यात. आच शक्यतो मंदच ठेवावी. नाहीतर पुऱ्या करपण्याची शक्यता असते. अगदी नाजूक हातानी तळुन घ्याव्यात
 11. किचेन टॉवेल वर काडून थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवाव्यात.
 12. चहाबरोबर सर्व्हे कराव्यात

My Tip:

आच शक्यतो मंदच ठेवावी. नाहीतर पुऱ्या करपण्याची शक्यता असते.

Reviews for Crispy Kasuri Methi Puri Recipe in Marathi (0)