रताळ्याचे चुरोस | Sweet Potato Churros Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Potato Churros recipe in Marathi,रताळ्याचे चुरोस, Sujata Hande-Parab
रताळ्याचे चुरोसby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  75

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

रताळ्याचे चुरोस recipe

रताळ्याचे चुरोस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Potato Churros Recipe in Marathi )

 • मैदा किंवा फ्लोर - १ कप
 • रताळे - १ कप उकडलेले व किसलेले
 • बटर - १ टेबलस्पून
 • साखर - यीस्ट मिश्रण साठी एक चिमूटभर
 • पिठी साखर - २ टीस्पून + २ टेबलस्पून वरून भुरभूरण्या साठी किंवा डस्ट करण्यासाठी 
 • मीठ - १/४ टीस्पून
 • दालचिनी पावडर - १ टिस्पून + १ टेबलस्पून (भुरभूरण्या साठी किंवा रोलिंग चुरोस)
 • ड्राय यीस्ट - १ टिस्पून
 • गरम पाणी - ३ टिस्पून 
 • तळण्यासाठी तेल
 • कॉफी चॉकलेट सॉस साठी - गोड चॉकलेट डार्क - ७५ ग्रॅम
 • क्रीम - ४५ ग्रॅम 
 • कॉफी - १ १/२ टिस्पून
 • दूध - १ टेबलस्पून

रताळ्याचे चुरोस | How to make Sweet Potato Churros Recipe in Marathi

 1. सॉस - एका पॅन किंवा टोपात क्रीम एक उकळी येईपर्यंत गरम करावी. बारीक कापलेले गडद गोड चॉकलेट घालावे. चांगले मिक्स करावे
 2. कॉफी पावडर आणि कोमट दूध घाला. मिश्रण चांगले चकचकीत किंवा शाईनी होईपर्यंत ढवळत राहा. घट्ट करू नये.
 3. चुरोस - एका छोट्या वाडग्यात कोमट पाणी (35-40-डिग्री से) घेऊन साखर विरघळवून घ्या.
 4. त्यात यीस्ट पूड खालून ढवळा आणि ५-१० मिनिटे बाजूला ठेवा. मिश्रणाला चांगले बुडबुडे येऊ द्या.
 5. एका मोठ्या खोल कटोरीत मैदा घेऊन त्यात मीठ, बटर, उकडून किसलेले रताळे, दालचिनी पावडर, पिठी साखर घालावे. चांगले मिक्स करावे
 6. चांगले फुगून आलेले यीस्ट मिश्रण घालून चांगले मिक्स करावे. कणिक थोडी चिकट आणि सॉफ्ट च ठेवा जेणेकरून चुरोस पाईप आऊट किंवा तेलात टाकताना काही अडचण येणार नाही.
 7. कणिक वाडगे प्लास्टिक ने झाकून ठेवा. उबदार ठिकाणी 1 ½ तास फुलून दुप्पट किंवा तिप्पट होण्यासाठी बाजूला ठेवा.
 8. एका जाड तळाच्या पॅन किंवा कढई मध्ये तेल गरम करून घ्या.
 9. एक पाईपिंग बॅग ला स्टार नोझल किंवा साचा व्यवस्तिथ लावून घ्या.
 10. त्यामध्ये फुगलेली कणिक भरून घेऊन तेलात ५-६ छोट्या पट्ट्यांमध्ये अलगद सोडा. कापण्यासाठी स्वयंपाक घरातील कैचीचा वापर करा.
 11. तेल फार गरम नसावे. कमी माध्यम आचेवरच तेलात सोडावे.
 12. सर्व बाजूंनी गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळणे.
 13. किचन टॉवेल किंवा टिशु पेपर वर काडून घ्या. अधीक तेलाचा निचरा होऊ द्या.
 14. एका प्लेट किंवा ताटात कडून त्यावर पिठीसाखर आणि दालचिनी पावडर यांचे मिश्रण टाकून व्यवस्तिथ घोळून घ्या. काही सेकंदांसाठी सेट करा
 15. चॉकलेट सॉससह गरम सर्व्ह करावे.

My Tip:

कणिक खूप घट्ट किंवा अतिशय पातळ नसावी.

Reviews for Sweet Potato Churros Recipe in Marathi (0)