बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवया | Pearl Millet (Bajra) idiyappam or shevaya Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pearl Millet (Bajra) idiyappam or shevaya recipe in Marathi,बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवया, Sujata Hande-Parab
बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवयाby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवया recipe

बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pearl Millet (Bajra) idiyappam or shevaya Recipe in Marathi )

 • इडिअप्पम किंवा शेवया - बाजरीचे पीठ - १ कप
 • तूप - २ टेबलस्पून 
 • स्वादानुसार मीठ
 • पाणी - १ कप 
 • नारळाच्या दुधासाठी - कोमट नारळ दूध - १ १/२ कप
 • किसलेला गूळ - ¼ -1/2 कप (आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करा)
 • जायफळ पावडर - 1/4 टीस्पून
 • वेलची पूड - 1/2 टिस्पून

बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवया | How to make Pearl Millet (Bajra) idiyappam or shevaya Recipe in Marathi

 1. नारळाच्या दुधासाठी - एका खोल वाडग्यात नारळाचे दूध घ्या. हे थोडेसे कोमट असावे.
 2. किसलेला गूळ घालावा. तो विरघळलेपर्यंत चांगला मिसळा.
 3. जायफळ आणि वेलची पूड घाला. चांगले मिक्स करावे
 4. दुसऱ्या वाडग्यात हे दूध गाळणीने गाळून घ्या. गोड नारळ दूध तयार आहे.
 5. इडिअप्पम किंवा शेवया - एक पॅन मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ आणि तूप घालावे. बाजरीचे पीठ हळूहळू टाकून मिक्स करावे.
 6. कणिक एकत्र येईपर्यंत व्यवस्तिथ मिक्स करावे. कमी ज्योत वर हे करा. कणीक थोडं चिकट असल्यास पिठ घाला आणि चांगले मिक्स करावे. गॅस बंद करून पॅन १५ मिनीट झाकून ठेवा.
 7. हाताला साधे पाणी लावून कणिक नरम मळून घ्या. मध्यम आकाराचे थोडे लंबकार गोळे करून घ्या.
 8. एका इडली पात्रामध्ये पाणी घेऊन ते गरम करण्यास ठेवा. इडली प्लेट्स किंवा साचाना तेल लावून घ्या.
 9. सर्वात छोट्या आकाराची शेव साचा घ्या. त्यात हे बनवलेले गोळे घालून व्यवस्तिथ दाबून घ्या. राहिलेली कणिक एका ओल्या कापडाने झाकून ठेवा.
 10. साचा बंद करून तयार इडली साचा वर इडिअप्पमस गोलाकार रीतीने प्रेस करून किंवा घालून घ्या.
 11. 5 मिनिटांसाठी इडीअप्पम स्टीम किंवा वाफवून घ्या. गॅस बंद करा. 3-4 मिनीटे कुकरमध्ये राहू द्या. इडली प्लेट बाहेर काडून काही सेकंड तसेच राहू द्या.
 12. फोर्क च्या मदतीने कडा थोड्या लूज करून घ्या. इडिअप्पम ताटात हळुवारपणे काडून घ्या.
 13. गोड नारळ दूध किंवा कोणत्याही मसालेदार करीबरोबर गरम सर्व्ह करा.

Reviews for Pearl Millet (Bajra) idiyappam or shevaya Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo