कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / अप्पे पात्रातील दाळ बाटी व दहीतील गट्टयाची भाजी

Photo of Dal bati with gatte's sabji by priya Asawa at BetterButter
0
3
0(0)
0

अप्पे पात्रातील दाळ बाटी व दहीतील गट्टयाची भाजी

Jul-12-2018
priya Asawa
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अप्पे पात्रातील दाळ बाटी व दहीतील गट्टयाची भाजी कृती बद्दल

झटपट होणारी एकदम स्वादिष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • राजस्थान
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बाटी साठी
  2. गव्हाचे पीठ जाडसर दळलेले 4 कप
  3. ज्वारी चे पीठ 1/2 कप
  4. दही 1/2 कप
  5. हळद 1/2 चमचा
  6. ओवा चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. वरण साठी
  9. शिजवून घेतलेली तुरी व मुगाची दाळ 2 कप
  10. फोडणी साठी तेल 2 चमचे
  11. मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, 2 हिरवी मिरची चे तुकडे, तेजपान 2
  12. लाल तिखट, हळद व मीठ
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर 1 चमचा
  14. लिंबू व कांदा
  15. गटट्याचचा भाजी साठी
  16. बेसन पिठ 1 कप
  17. लाल तिखट 1/2 चमचा , हळद 1/2, जीरा पावडर व ओवा पावडर 1 चमचा , मीठ चवीनुसार
  18. फोडणी साठी
  19. तेल 2 चमचे
  20. मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता
  21. लाल तिखट 1 चमचा
  22. हळद पाव चमचा
  23. धने पावडर 2 चमचे
  24. दही 1/2 कप
  25. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बाटी ला लागणारी सगळी सामग्री मिक्स करून कोमट पाण्यात आवश्यकता नुसार पाणी घालून पिठ नरम मळून घ्या व 15 मिनिट झाकून भिजवून ठेवा
  2. अप्पे पात्राला तुप लावुन गॅसवर ठेवा व पिठाचे छोटे छोटे गोळे करून पात्रात ठेवा व कमी गॅस करा व पात्रावर झाकण ठेवा
  3. एका बाजूने भाजुन झाल्यावर दुसरी बाजू भाजुन घ्या
  4. एका पातेल्यात 2 कप चांगले तुप घेऊन गरम करा व त्याच्यात बाटी टाकून भिजवून घ्याव
  5. दाळ साठी
  6. फोडणी साठी तेल गरम करायला ठेवा
  7. तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची चे तुकडे, तेजपान, लाल तिखट, हळद , मीठ, शिजवलेले वरण वर आवश्यकता नुसार पाणी घालून उकळून घ्या व वरुन कोथिंबीर घाला
  8. गट्टे साठी लागणारी सगळी सामग्री मिक्स करून घ्या व कोमट पाण्यात पीठ घट्ट मळून घ्या
  9. हाताला तेल लावून पिठाचा च्या लांब लांब स्टिक करून घ्यावी
  10. एका कडाईत पाणी गरम करायला ठेवा पाणी उकळी आली की गट्टे पाणी सोडुन शिजवून घ्यायचे गट्टे पाणी निथळून घ्यावे व स्टिक गार झाले कि त्याचे गट्टे छोटे छोटे कट करुन घ्यावे
  11. भाजीचा फोडणी साठी तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले की त्यात मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, लाल तिखट, हळद , दही, धने पावडर, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन 5 मिनिट वाफवून घ्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर