मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदुळ व ज्वारीचा पिठाचे व्हेज बर्ड नेस्ट

Photo of Vej Bird's Nest of rice and jowar flour . by priya Asawa at BetterButter
1214
5
0.0(0)
0

तांदुळ व ज्वारीचा पिठाचे व्हेज बर्ड नेस्ट

Jul-12-2018
priya Asawa
25 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदुळ व ज्वारीचा पिठाचे व्हेज बर्ड नेस्ट कृती बद्दल

जेवडी दिसायला आकर्षक आहे तितकीच खायला रुचकर आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 ते 5 बटाटे उकडून मॅश केलेले
  2. कांदा बारीक चिरलेला 1 कप
  3. लसूणपेस्ट 1 चमचा
  4. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  5. लाल तिखट 1 चमचा
  6. जीरा पावडर 1 चमचा
  7. चाट मसाला 1 चमचा
  8. कोथिंबीर बारीक चिरलेली 1 चमचा
  9. मीठ चवीनुसार नुसार
  10. गव्हाच्या शेवाया चांगल्या तुपात भाजुन घेतलेल्या 1/2 कप
  11. तांदळाचे पिठ 3 मोठे चमचे
  12. ज्वारी पिठ 2 मोठे चमचे
  13. तेल तळण्यासाठी
  14. पनीर मिक्सर मधुन मऊ काढलेले 3 चमचे
  15. कोथिंबीर चे पान सजवायला

सूचना

  1. प्रथम शेवाया तुपात लालसर भाजुन घ्या
  2. एका बाऊल मध्ये मॅश केलेला बटाटा, कांदा, लसूण हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट, जीरा पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करुन घ्यावे
  3. एका बाऊल मध्ये तांदळाचे,ज्वारीचे पीठ, चवीनुसार मीठ, व पाणी टाकून मध्यम घोळ तयार करावा
  4. हाताला तेल लावून बटाटेचे गोल बाॅल तयार करावेत व अंगठ्याने मधल्या बाजु दाबावेत नेस्ट सारखे आकार करून घ्यावा व बाॅल घोळ मध्ये भिजवून काडावा एक प्लेट मध्ये शेवाया पसरुन घ्यावा व तयार केलेला नेस्ट शेवाया वर रोल करुन घ्यावे म्हणजे शेवाया नेस्ट ला चिटकतील
  5. तयार नेस्ट 1/2 तास साठी सेट करायल फ्रिज मध्ये ठेवावेत
  6. 1/2 तासानंतर तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवावा
  7. तेल गरम झाले कि नेस्ट हळूच सोडून तळून घ्यावे
  8. पक्ष्यांचे अंडे दाखवण्यासाठी मिक्सर मधुन काढलेला पनीर चे बारीक बारीक बाॅल तयार करावेत
  9. सर्वींग करताना एक कोथिंबीर चे पान खाली ठेवा त्याच्यावर नेस्ट ठेवा नेस्ट मध्ये परत एक कोथिंबीर चा पान ठेवा व त्याच्यावर 2 पनीर चे बाॅल ठेवा आपले बर्ड नेस्ट तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर