मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पाईसी सूपी स्पाईरल्स

Photo of Spicy soupy spirals by Smita Koshti at BetterButter
498
3
0.0(0)
0

स्पाईसी सूपी स्पाईरल्स

Jul-12-2018
Smita Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पाईसी सूपी स्पाईरल्स कृती बद्दल

ही माझी एक इनोव्हेटिव्ह पाककृती आहे. आजकाल सगळीकडेच मुलांना पास्ता, मॅगी असलं खूप आवडते. घरची पौष्टिक भाजी पोळी नको असते. मग त्यांच्यासाठी ही डिश उत्तम आहे. एकदा नक्की करून बघा, बच्चे कंपनी सोबत मोठेही खुश होतील. व पौष्टिक पदार्थ असल्याने आपणही खुश.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी कणीक
  2. 1 छोटा चमचा नागली पीठ
  3. 1छोटा चमचा बेसन
  4. 1 छोटा चमचा ज्वारीचे पीठ
  5. 1/2 छोटा चमचा सोयाबीन पीठ
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल फोडणी साठी
  8. 3 चमचे तुर डाळ
  9. 1 प्रत्येकी कच्चा टोमॅटो,पिकलेला टोमॅटो ,कांदा, बटाटा, शिमला, वांग
  10. मुठभर आंबट चुक्याची भाजी
  11. कोथिंबीर बारीक चिरून
  12. 3 मिरच्या (तिखट नसलेल्या)
  13. 1 प्रत्येकी चमचा शेंगदाणे व खोबऱ्याचे काप
  14. 1 प्रत्येकी चमचा शेंगदाणे कूट व खोबरा कीस
  15. 2 चमचे हिरवी मिरची, अद्रक, लसूण पेस्ट
  16. कढीपत्ता पाने 2....4
  17. 1 चमचा जिरे व मोहरी
  18. हिंग चिमूटभर
  19. 1/2 छोटा चमचा हळद

सूचना

  1. सगळे पीठं एकत्र करून कणीक चांगली मळून घ्यावी.( मी थोडे सोयाबीन दाणे गहू दळतानाच टाकत असते.)
  2. कणकेचे छोटे गोळे घेऊन लांब लांब वळून घ्या. व चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टीकला गुंडाळून घ्या. ( बाजारात लाकडी काड्या मिळतात 5...7 इंचापर्यंत, किंवा गोल आईसक्रीम काड्याही वापरू शकतो.)
  3. लगेच ह्या स्टीक उकळत्या पाण्यात सोडा 2..3 मिनिटांनी काढून थंड पाण्यात टाका ..स्पाईरल्स काडीवरून काढून घ्या. आपले स्पाईरल्स तयार..
  4. स्पाईरल तयार करण्याआधी सर्व भाज्या बारीक चिरून त्यात कांदा ,तुर डाळ ,शेंगदाणे, खोबरे काप, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून हळद हे सर्व टाका व मऊ शिजवून घ्या. म्हणजे कुकर होईपर्यंत स्पाईरल तयार होणार.
  5. कुकर झाल्यानंतर सर्व मिश्रण हलके घोटून घ्या .
  6. फोडणी साठी तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता पाने ,व मिरची पेस्ट टाकून चांगले तळून घ्या. लगेच त्यात शेंगदाणे कूट, खोबरे कीस घालून चांगले परतून घ्या. लगेच त्यात घटलेले मिश्रण घालून मीठ टाकावे आणि उकळी आणावी.
  7. नंतर त्यात स्पाईरल टाकून पुन्हा उकळी आणावी. व कोथिंबीर बारीक चिरून घालायची .
  8. गरम गरम सर्व्ह करावे. आवडत असल्यास थोडा लिंबाचा रस व बारीक चिरलेला कांदा घालू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर