भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणी | Corn Layered Paratha with Green Chatni Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corn Layered Paratha with Green Chatni recipe in Marathi,भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणी, Vaishali Joshi
भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणीby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणी recipe

भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn Layered Paratha with Green Chatni Recipe in Marathi )

 • भुट्टा (कॉर्न )चे दाणे ३ कप
 • कणिक १ कप
 • मैदा १/२ कप
 • तांदुळाचे पीठ १/४
 • मिर्ची लसूण जीरे ठेचा २ -३ चमचे
 • कोथिंबीर
 • लिंबू रस
 • तिखट
 • हळद
 • मीठ
 • बटर
 • चटनी साठी - हिरव्या मिरच्या ४-५
 • लसूण पाकळ्य़ा ५-६
 • पुदिन्याची पान १/४ कप
 • जीर १/२ चमचा
 • कोथिंबिर
 • मीठ
 • आंबट दही १/४

भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणी | How to make Corn Layered Paratha with Green Chatni Recipe in Marathi

 1. कणिक , मैदा आणि तांदळा चे पीठ तिन्ही पीठ एकत्र करुन त्यात मीठ आणि २ चमचे बटर घालून पाण्याने भिजवून , खुप मळुन झाकून ठेवा .
 2. भुट्टा चे दाणे मिर्ची कटर मधे खरबरीत वाटून घ्या , त्यात लसूण मिर्ची जीरे ठेचा , तिखट , हळद ,मीठ , कोथिंबिर , लिंबू रस आणि १ चमचा बटर घालून चमच्याने चांगले मिक्स करुन हे सारण बाजूला ठेवा .
 3. मळून ठेवलेल्या पिठाचे गोळे करा ,एक एक गोळा घेवुन त्याची नेहेमी पेक्षा जरा जाडसर पोळी लाटा आणि त्याला टोचे मारून घ्या , सारण चिपकुन राहाण्यास मदत व्हावी म्हणून .
 4. गरम तव्या वर पोळी टाका , गैस मंद असू द्या ,पोळी एका बाजूने शेकून पलटून घ्या आणि वरच्या बाजु वर सारणा ची जाडसर लेअर पसरवा . आजुबाजुने बटर सोडा .२ मिनिट झाकण ठेवा .बाजु पलटून दुसरया (सारण वाली )बाजूने बटर सोडून सराट्याने दाबुन दाबुन भाजून घ्या . अशा प्रकारे क्रिस्पी भुट्टा लेअर्ड पराठा बनून तयार .
 5. चटनी करुन घेउ - चटनी साठी घेतलेले सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सर मधे थोड पाणी घालून फिरऊन घ्यावे की झाली चटनी तयार
 6. सर्विंग प्लेट मधे गरम पराठे आणि ग्रीन चटनी सर्व्ह करा

Reviews for Corn Layered Paratha with Green Chatni Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo