BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणी

Photo of Corn Layered Paratha with Green Chatni by Vaishali Joshi at BetterButter
229
5
0(0)
0

भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणी

Jul-13-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भुट्टा (कॉर्न) लेअर्ड पराठा विथ ग्रीन चटणी कृती बद्दल

कॉर्न चे पराठे आपण सर्वच नेहेमीच बनवतो . तेच साहित्य घेवुन पण वेगळ्या पद्धतीने मी हे पराठे बनविले . तुम्ही पण ट्राय करुन बघा .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • स्टर फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. भुट्टा (कॉर्न )चे दाणे ३ कप
 2. कणिक १ कप
 3. मैदा १/२ कप
 4. तांदुळाचे पीठ १/४
 5. मिर्ची लसूण जीरे ठेचा २ -३ चमचे
 6. कोथिंबीर
 7. लिंबू रस
 8. तिखट
 9. हळद
 10. मीठ
 11. बटर
 12. चटनी साठी - हिरव्या मिरच्या ४-५
 13. लसूण पाकळ्य़ा ५-६
 14. पुदिन्याची पान १/४ कप
 15. जीर १/२ चमचा
 16. कोथिंबिर
 17. मीठ
 18. आंबट दही १/४

सूचना

 1. कणिक , मैदा आणि तांदळा चे पीठ तिन्ही पीठ एकत्र करुन त्यात मीठ आणि २ चमचे बटर घालून पाण्याने भिजवून , खुप मळुन झाकून ठेवा .
 2. भुट्टा चे दाणे मिर्ची कटर मधे खरबरीत वाटून घ्या , त्यात लसूण मिर्ची जीरे ठेचा , तिखट , हळद ,मीठ , कोथिंबिर , लिंबू रस आणि १ चमचा बटर घालून चमच्याने चांगले मिक्स करुन हे सारण बाजूला ठेवा .
 3. मळून ठेवलेल्या पिठाचे गोळे करा ,एक एक गोळा घेवुन त्याची नेहेमी पेक्षा जरा जाडसर पोळी लाटा आणि त्याला टोचे मारून घ्या , सारण चिपकुन राहाण्यास मदत व्हावी म्हणून .
 4. गरम तव्या वर पोळी टाका , गैस मंद असू द्या ,पोळी एका बाजूने शेकून पलटून घ्या आणि वरच्या बाजु वर सारणा ची जाडसर लेअर पसरवा . आजुबाजुने बटर सोडा .२ मिनिट झाकण ठेवा .बाजु पलटून दुसरया (सारण वाली )बाजूने बटर सोडून सराट्याने दाबुन दाबुन भाजून घ्या . अशा प्रकारे क्रिस्पी भुट्टा लेअर्ड पराठा बनून तयार .
 5. चटनी करुन घेउ - चटनी साठी घेतलेले सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सर मधे थोड पाणी घालून फिरऊन घ्यावे की झाली चटनी तयार
 6. सर्विंग प्लेट मधे गरम पराठे आणि ग्रीन चटनी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर