मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत ग्रीन समोसा

Photo of Green Coriander Flavour Samosa by Bharti Kharote at BetterButter
0
3
0(0)
0

चटपटीत ग्रीन समोसा

Jul-13-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत ग्रीन समोसा कृती बद्दल

समोसा हा खाद्यपदार्थ संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. .आज मला कव्हर बनवण्यासाठी नेहमीच्या समोशा पेक्षा वेगळी टेस्ट हवी होती. .म काय मलाच अगदी सहज सुचलेली चटपटीत पाककृती..बघुया तर मग..:blush::blush:

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

 1. दोन कप मैदा
 2. दोन टेबलस्पून तेल
 3. एक कप कोथिंबीर पयुरी (आल लसूण हिरवी मिरची चवीनुसार मिक्सर मध्ये वाटून )
 4. पाव चमचा जीरे पूड ओवा
 5. चवीनुसार मीठ
 6. स्टफींग साठी --
 7. दोन मध्यम आकाराचे ऊकडलेले बटाटे
 8. तेल जीरे आल लसूण पेस्ट फोडणी साठी
 9. पाव चमचा हळद हिरवी मिरची एक चिरून
 10. कोथिंबीर चिरून
 11. अर्धी वाटी खोबरयाचा खीस
 12. चवीनुसार मीठ
 13. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. एका वाडग्यात मैदा घेऊन त्यात जीरे पूड ओवा मीठ आणि तेल टाकून हाताने मिक्स करून घ्या. .
 2. ईमेज मध्ये दाखवल्या प्रमाणे पिठाची मूठ वाळली गेली पाहिजे. .
 3. आता त्यात कोथिंबीर ची पयुरी घाला. .
 4. मिक्सर मध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आल लसूण आणी थोडे पाणी घालून पेस्ट बनवायची. .
 5. आता पीठ चांगल मळून एकजीव करा...छान ग्रीन कलर येतो...
 6. 15 मी. बाजूला ठेवा. .
 7. तोपर्यंत स्टफींग करून घ्या. .
 8. ऊकडलेले बटाटे कुस्करून घ्या. .
 9. पॅन मध्ये तेल टाकून जीरे आल लसूण पेस्ट हळद घालून फोडणी करा. .त्यात बटाटे घालून चांगल परतून घ्या. .चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर आणि खोबरयाचा खीस घाला. .
 10. चांगल हलवून स्टफींग तयार करा. ..
 11. कणिक चे छोटे गोळे करून मध्यम आकाराची पोळी लाटून घ्या. .
 12. तीला चाकू ने मधोमध कापून घ्या. .
 13. आता अर्ध गोलाकार पोळी ला कडेने बोटांनी पाणी लावून दोन्ही पदर मधोमध दूमडून शंखूचा आकार दया. ..
 14. त्यात चमचा ने स्टफींग भरा..
 15. त्यात बसेल तेवढेच भरा..
 16. बोटांनी सर्व कडा बंद करा. .
 17. असेच सर्व समोसे बनवून घ्या. .खूप सुंदर कलर आलाय..
 18. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 19. तेल तापल्यावर त्यात समोसे सोडा. .
 20. एका वेळेस तीन समोसे तळू शकता. .
 21. असेच सर्व समोसे तळून घ्या. .आणि टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा. ..गरमागरम. ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर