पालक धपाटा | PALAK Dhapata Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • PALAK Dhapata recipe in Marathi,पालक धपाटा, Chayya Bari
पालक धपाटाby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पालक धपाटा recipe

पालक धपाटा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PALAK Dhapata Recipe in Marathi )

 • पालक प्युरी 1बाऊल
 • बाजरीचे पीठ 4 वाट्या
 • बेसन 2 चमचे
 • हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
 • आले,लसूण पेस्ट 1 चमचा
 • मीठ चवीपुरते
 • हळद 1/2चमचा ऐच्छिक
 • ओवा 1/2चमचा
 • तीळ 4 चमचे
 • धने जिरे पूड 1/2चमचा प्रत्येकी
 • तेल 1/4वाटी

पालक धपाटा | How to make PALAK Dhapata Recipe in Marathi

 1. प्रथम पालक धुवून बुडेल इतक्या पाण्यात चिमुटभर मीठ घालून उकळून घ्यावा व गार करून extra पाणी काढून मिक्सरवर प्युरी बनवावी
 2. आता बाजरीचे पिठात सर्व सामग्री व 1 चमचा तेल घालून प्युरी टाकून मळून घ्यावे
 3. तयार पिठाचा धपाटा ओल्या कापडावर थापून तापलेल्या नॉनस्टिक पॅनवर कापड उलट करून टाकावा व होले पडून तेल सोडावे
 4. उलटून परत तेल सोडावे
 5. दोन्ही बाजूने तेल सोडून खरपूस भाजावे
 6. तयार धपाटे चटनी बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

ह्यात मीठ घालताना जपून कारण पालक वाफवताना मीठ घातलेले आहे

Reviews for PALAK Dhapata Recipe in Marathi (0)