स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून) | Whole wheat Stuffed Garlic Bread Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Whole wheat Stuffed Garlic Bread recipe in Marathi,स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून), Archana Chaudhari
स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून)by Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  3

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून) recipe

स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Whole wheat Stuffed Garlic Bread Recipe in Marathi )

 • ब्रेडसाठी
 • गहू पीठ -२ १/२ कप
 • मैदा - ३/४ कप
 • साखर -१ टीस्पून
 • मीठ - चवीनुसार
 • इस्टंट यीस्ट - १/२ टीस्पून
 • कोमट पाणी - १ कप
 • कोमट दूध- १ कप
 • ऑलिव्ह तेल- २ टेबलस्पून
 • चिली फ्लॅक्स- १/२ टीस्पून
 • ऑरेंगानो -१/२ टीस्पून
 • गार्लिक सॉससाठी
 • बटर -१ टेबलस्पून
 • लसूण पेस्ट -१ टेबलस्पून
 • मीठ-चवीप्रमाणे
 • ऑरेंगानो -१ टीस्पून
 • आतील सारण
 • पनीर -१ कप बारीक कापलेले
 • चीज क्युब - १ कप बारीक कापलेले
 • पिझ्झा मसाला-१ टीस्पून
 • ऑरेंगानो-१ टीस्पून
 • चिली फ्लॅक्स -१ टीस्पून
 • मक्याचे पीठ -१ कप
 • बटर- २ टेबलस्पून

स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून) | How to make Whole wheat Stuffed Garlic Bread Recipe in Marathi

 1. गाहूपीठ,मैदा,मीठ,साखर,इस्टंट यीस्ट,चिली फ्लॅक्स, ऑरेंगानो सगळे एकत्र करा.
 2. कोमट दूध आणि कोमट पाणी एकत्र करा.
 3. आता एका भांड्यात कोरड्या साहित्या मध्ये दूध आणि पाण्याचे मिश्रण टाकून मऊ गोळा बनवून घ्या.
 4. १० ते १२ मिनिटे चांगले मळून घ्या.
 5. आता काचेच्या भांड्यात १ चमचा तेल टाकून मळलेला गोळा ठेवा.
 6. वरून क्लिंग फिल्म लावून ३ तास झाकून ठेवा.(गोळा दुप्पट होण्याची वेळ हवामानानुसार बदलू शकते.)
 7. ३ तासांनंतर गोळा छान दुप्पट झालेला असेल.
 8. आता परत एकदा हळुवार मळून घ्या.
 9. गार्लिक ब्रेड करण्यासाठी कणिक तयार आहे.
 10. आता या गोळ्यांचे सारख्या आकाराचे लहान गोळे करून घ्या.आणि १० ते १५ मिनिटे कपड्याने झाकून ठेवा.
 11. एका लहान भांड्यात बटर,लसूण,मीठ आणि ऑरेंगानो टाकून सॉस बनवून घ्या.(जर बटर सॉलटेड असेल तर मीठ कमी टाका)
 12. सारणासाठी चे साहित्य एकत्र करून घ्या.
 13. आता ओट्यावर मक्याचे पीठ टाकून ब्रेडच्या कणकेचा १ गोळा घेऊन हातानेच त्याला गोल लहान पोळीसारखा आकार द्या.
 14. आता वरून ब्रशने गार्लिक सॉस लावा.
 15. आता अर्ध्या भागात सारण ठेवा.
 16. आता ही पोळी दुमडा,आणि काट्या च्या सहाय्याने कडा दाबून घ्या.
 17. वरून सुरीने हलकेच १ इंचाच्या अंतराने कट मारा.
 18. वरून ब्रशने बटर लावून ऑरेंगानो, चिली फ्लॅक्स टाका.
 19. स्टफ्ड गार्लिक ब्रेड ओव्हन मध्ये जायला तयार आहेत. :blush:
 20. आता ओव्हन १८० अंश सेंटिग्रेड ला प्रीहिट करून घ्या.
 21. आता १८० अंश सेंटिग्रेड ला २० मिनिटे बेक करा.
 22. आता २२० अंश सेंटिग्रेड ला ५ मिनिटे ठेवा. यामुळे ब्रेडला वरून छान सोनेरी रंग येतो.
 23. ओव्हन मधून काढल्यावर ५ मिनिटांनी कापा.
 24. या प्रमाणे :blush:

My Tip:

आवडीचे हर्ब्स टाकू शकता.पनीर ऐवजी,सोया चक्स,बटाटा,चिकन टाकू शकता.

Reviews for Whole wheat Stuffed Garlic Bread Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo