मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून)

Photo of Whole wheat Stuffed Garlic Bread by archana chaudhari at BetterButter
477
2
0.0(0)
0

स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून)

Jul-13-2018
archana chaudhari
180 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफड गार्लिक ब्रेड (गव्हाचे पीठ वापरून) कृती बद्दल

मुलांच्या आणि मोठ्यांच्याही आवडीचा गार्लिक ब्रेड ....गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे हेल्दी पण!!!

रेसपी टैग

  • किड्स बर्थडे
  • इटालियन
  • बेकिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. ब्रेडसाठी
  2. गहू पीठ -२ १/२ कप
  3. मैदा - ३/४ कप
  4. साखर -१ टीस्पून
  5. मीठ - चवीनुसार
  6. इस्टंट यीस्ट - १/२ टीस्पून
  7. कोमट पाणी - १ कप
  8. कोमट दूध- १ कप
  9. ऑलिव्ह तेल- २ टेबलस्पून
  10. चिली फ्लॅक्स- १/२ टीस्पून
  11. ऑरेंगानो -१/२ टीस्पून
  12. गार्लिक सॉससाठी
  13. बटर -१ टेबलस्पून
  14. लसूण पेस्ट -१ टेबलस्पून
  15. मीठ-चवीप्रमाणे
  16. ऑरेंगानो -१ टीस्पून
  17. आतील सारण
  18. पनीर -१ कप बारीक कापलेले
  19. चीज क्युब - १ कप बारीक कापलेले
  20. पिझ्झा मसाला-१ टीस्पून
  21. ऑरेंगानो-१ टीस्पून
  22. चिली फ्लॅक्स -१ टीस्पून
  23. मक्याचे पीठ -१ कप
  24. बटर- २ टेबलस्पून

सूचना

  1. गाहूपीठ,मैदा,मीठ,साखर,इस्टंट यीस्ट,चिली फ्लॅक्स, ऑरेंगानो सगळे एकत्र करा.
  2. कोमट दूध आणि कोमट पाणी एकत्र करा.
  3. आता एका भांड्यात कोरड्या साहित्या मध्ये दूध आणि पाण्याचे मिश्रण टाकून मऊ गोळा बनवून घ्या.
  4. १० ते १२ मिनिटे चांगले मळून घ्या.
  5. आता काचेच्या भांड्यात १ चमचा तेल टाकून मळलेला गोळा ठेवा.
  6. वरून क्लिंग फिल्म लावून ३ तास झाकून ठेवा.(गोळा दुप्पट होण्याची वेळ हवामानानुसार बदलू शकते.)
  7. ३ तासांनंतर गोळा छान दुप्पट झालेला असेल.
  8. आता परत एकदा हळुवार मळून घ्या.
  9. गार्लिक ब्रेड करण्यासाठी कणिक तयार आहे.
  10. आता या गोळ्यांचे सारख्या आकाराचे लहान गोळे करून घ्या.आणि १० ते १५ मिनिटे कपड्याने झाकून ठेवा.
  11. एका लहान भांड्यात बटर,लसूण,मीठ आणि ऑरेंगानो टाकून सॉस बनवून घ्या.(जर बटर सॉलटेड असेल तर मीठ कमी टाका)
  12. सारणासाठी चे साहित्य एकत्र करून घ्या.
  13. आता ओट्यावर मक्याचे पीठ टाकून ब्रेडच्या कणकेचा १ गोळा घेऊन हातानेच त्याला गोल लहान पोळीसारखा आकार द्या.
  14. आता वरून ब्रशने गार्लिक सॉस लावा.
  15. आता अर्ध्या भागात सारण ठेवा.
  16. आता ही पोळी दुमडा,आणि काट्या च्या सहाय्याने कडा दाबून घ्या.
  17. वरून सुरीने हलकेच १ इंचाच्या अंतराने कट मारा.
  18. वरून ब्रशने बटर लावून ऑरेंगानो, चिली फ्लॅक्स टाका.
  19. स्टफ्ड गार्लिक ब्रेड ओव्हन मध्ये जायला तयार आहेत.:blush:
  20. आता ओव्हन १८० अंश सेंटिग्रेड ला प्रीहिट करून घ्या.
  21. आता १८० अंश सेंटिग्रेड ला २० मिनिटे बेक करा.
  22. आता २२० अंश सेंटिग्रेड ला ५ मिनिटे ठेवा. यामुळे ब्रेडला वरून छान सोनेरी रंग येतो.
  23. ओव्हन मधून काढल्यावर ५ मिनिटांनी कापा.
  24. या प्रमाणे:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर