पाटवडी रस्सा | PATWADI Rassa/ Patodi Rassa Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • PATWADI Rassa/ Patodi Rassa recipe in Marathi,पाटवडी रस्सा, Shubha Salpekar Deshmukh
पाटवडी रस्साby Shubha Salpekar Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पाटवडी रस्सा recipe

पाटवडी रस्सा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PATWADI Rassa/ Patodi Rassa Recipe in Marathi )

 • पाटवडी साठी-
 • 1 वाटी बेसन
 • 1 टेबलस्पून तेल
 • 1/2 टीस्पून हळद
 • 1/2 टीस्पून लाल तिखट
 • 1/4 टीस्पून ओवा
 • 1/4 टीस्पून भाजलेले धणे
 • कोथिंबीर
 • ओला खोबरं
 • मीठ
 • रसश्या साठी-
 • 2 कांदे
 • 7-8 लसूण पाकळ्या
 • 1" आलं
 • 2 टेबल स्पून तेल
 • 1 टेबल स्पून धणे
 • 1 टेबलस्पून सुकं खोबरं
 • 1 टेबल स्पून खसखस
 • 1 तेजपान
 • खडे गरम मसाले ( छोटी इलायची, मोठी इलायची, लवंग, गोल मिरी, दालचिनी, स्टार फुल, शाहजीर, जावित्री)
 • 1/2 टीस्पून जिरं
 • 2 हिरव्या मिरच्या
 • फोडणी साठी-
 • 2 टेबल स्पून तेल
 • मोहरी
 • जिरं
 • हळद
 • काश्मिरी लाल तिखट
 • मीठ

पाटवडी रस्सा | How to make PATWADI Rassa/ Patodi Rassa Recipe in Marathi

 1. सगळ्यात आधी बेसन पीठ, मीठ, ओवा, भाजलेले धणे, पाणी एकत्र करून, त्याला साधी फोडणी देऊन , शिजवून घ्यावे। घट्ट झाल्यावर ह्याला तेल लावलेल्या पाटावर पसरवून घ्यावे। थोडं थंड झाल्यावर वड्या काढून घ्याव्यात। वरून कोथिंबीर आणि खोबरं घालावे।
 2. आता ग्रेव्ही साठी, कढईत तेल गरम करून घ्यावे। यात खडे मसाले, खसखस, धणे, कांदे, मिरच्या, लावून, आलं, जिरं, तेजपान, खोबरं घालून अगदी मंद आचेवर छान परतावे। मिश्रण थंड करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे।
 3. कढईत तेल तापवून, जिरं, मोहरी, हिंग घालावे। यात बारीक केलेला मसाला घालून 5 मिनिटे परतून घ्यावा। हळद, काश्मिरी लाल तिखट आणि मीठ घालावे।आता पाणी घालून पातळ रस्सा करावा, उकळी आली की गॅस बंद करावे।
 4. पाटवड्या या रसश्यात घालून, कोथिंबीर टाकून, गरम गरम फुलके किंव्हा भाकरी सोबत सर्व्ह करावे।

My Tip:

ही भाजी झणझणीत असते, तेल आणि तिखटाचं भरपूर वापर करून बनवावी लागते।

Reviews for PATWADI Rassa/ Patodi Rassa Recipe in Marathi (0)