मुख्यपृष्ठ / पाककृती / अळूच्या पानांचे मुठिया

Photo of Colocasia Leaves Muthia by Sujata Hande-Parab at BetterButter
724
7
0.0(0)
0

अळूच्या पानांचे मुठिया

Jul-14-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळूच्या पानांचे मुठिया कृती बद्दल

अळूची पाने हा प्रथिने आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे. अळूची पाने, मुळे मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात आणि त्यापासून अनेक पाककृती हि तयार केल्या जातात. अळूची पाने बरेच प्रकारची असतात. त्यातील मुख्यतः एक एकदम हिरवे असणारे, फक्त पावसाच्या मोसमातच आदळते. ह्या पानांना खाजेचे प्रमाण खूप असते. ह्यापासून अळूची पातळ भाजी केली जाते. दुसरा प्रकार वर्षाचे बाराही महिने आढळतो आणि ह्याला महाराष्ट्रात आणि कोकणात दुधाचे किंवा गोड अळू म्हणून ओळखले जाते. हे मुख्यतः अळू वडी बनवण्यासाठी वापरतात. कोकणात, गुजरात, साऊथ भागांमध्ये अळूच्या पानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वापर करताना अळूची पाने व्यवस्तिथ धुऊन त्यावर कोकम पाणी किंवा चिंचेची पेस्ट लावून काही मिनिटे ठेवले जाते. जेणे करून खाजेचे प्रमाण कमी करता येते. हि माझी इनोवेटिव्ह रेसिपी आहे. ह्यात मी अळूची पाने, गव्हाचे पीठ, बेसन वापरून मुठिया किंवा वडी बनवलेली आहे. ह्या तळल्या नंतर खूपच स्वादिष्ट लागता त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन - १ कप
  2. गहू पीठ - ४ टेबलस्पून
  3. अळूची पाने -३/४ कप (बारीक चिरून आणि दाबून घेतलेली)
  4. तीळ सफेद - १/२ टेबलस्पून.
  5. चिंचेची पेस्ट - १ टिस्पून
  6. हिंग - १/२ टिस्पून
  7. धणे पूड - १/२ टिस्पून
  8. जिरेपूड - १/२ टिस्पून
  9. हळद - १/२ टिस्पून
  10. लाल तिखट - १ टिस्पून
  11. बेकिंग सोडा - १/४ टीस्पून
  12. किसलेला गूळ - १/२ टिस्पून
  13. ताजे आले - १ टीस्पून जाडसर वाटलेले 
  14. हिरवी मिरची - २ जाडसर वाटलेले 
  15. लसूण पाकळ्या - ३ जाडसर वाटलेले 
  16. चवीनुसार मीठ
  17. तेल - तळण्यासाठी- १ टेबलस्पून + २ टीस्पून फोडणी
  18. पाणी - १/२ -१ टेबलस्पून (थोडे थोडे वापरावे) 
  19. फोडणीसाठी - कढीपत्ता पाने - ३-४
  20. तीळ सफेद - १/२ टेबलस्पून 
  21. जिरे - १/२ टेबलस्पून 
  22. हिंग - १/४ टीस्पून

सूचना

  1. अळूची पाने चांगली धुवून, पुसून फूड प्रोसेसरच्या वापरून एकदम बारीक करून घ्या. किंवा चिरून घ्या.
  2. चिंचेची पेस्ट आणि मीठ घाला. बारीक चिरलेली पानांवर चांगले चोळून घ्या. 15 मिनिटे बाजूला ठेवा
  3. एका वाडग्यात बेसन, गव्हाचे पीठ, जीरे, धणे पूड, लाल मिरची पूड, हिंग, बेकिंग सोडा, तेल, पांढरे तीळ, किसलेले गूळ, जाडसर वाटलेले ताजे आले आणि हिरवी मिरची ,लसूण घ्या. चांगले मिक्स करा.
  4. अळूची पानाचे मिश्रण घाला. चांगले मिक्स करून घ्या.
  5. थोडेसे मीठ घालावे. चांगले मिक्स करावे. आपण आधीच अळूच्या पानांना मीठ लावून घेतलेले आहे.
  6. एकावेळी थोडे थोडे पाणी घाला आणि मिश्रण तयार करा. हे थोडे चिकट होईल. कणिक मळतो तसे एकत्र करून घ्या.
  7. हात वर थोडे तेल किंवा पाणी लावून घ्या. मिश्रणाचे दोन लंबकार (४-५ इंच लांब) गोळ्यांमध्ये विभाजन करा.
  8. प्लेट वर थोडे तेल पसरवून घ्या आणि बनवलेले लॉग्स त्यावर ठेवा.
  9. स्टीमर किंवा कुकरमध्ये वाफवुन घ्या. (प्रेशर कूकरचा वापर केल्यास, 3 शिट्ट्यासाठी शिजवा आणि स्टीमरमध्ये 20-22 मिनिटे ते शिजवावे.
  10. गॅस बंद करा. कुकरच्या दाब सहजपणे खाली येऊ द्या.
  11. थंड होऊ द्या. दीड इंच जाड काप करून घ्या.
  12. एका कढईत तेल गरम करावे. कढीपत्ता पाने घाला. काही सेकंद ढवळा.
  13. जिरे, पांढरे तीळ, घालून त्यांना तडतडू द्या.
  14. हिंग घाला. परतून घ्या.
  15. कापलेल्या मुठिया किंवा वड्यां घाला आणि गोल्डन ब्राऊन, कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  16. चहा, कॉफ़ीसह गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर