मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पीठांचा शेजवान मश्रूम चिली चीज पराठा

Photo of Multigrain Schezwan Mushroom Chili Cheese Paratha by Sujata Hande-Parab at BetterButter
591
4
0.0(0)
0

मिक्स पीठांचा शेजवान मश्रूम चिली चीज पराठा

Jul-14-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पीठांचा शेजवान मश्रूम चिली चीज पराठा कृती बद्दल

या कृती मध्ये मी मसालेदार शेझवान सॉस, बरेच भाज्या आणि विविध प्रकारची पीठे वापरुन पराठा तयार केला आहे. हि फ्यूजन डिश आहे; भारतीय पराठा आणि चायनीज सारण भरून पटकन होणारा, थोडासा वेगळा आणि हेलथी अशी हि डिश अतिशय स्वादिष्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मिक्स पिठांची कणिक मळण्यासाठी - गव्हाचे पीठ - १ कप
  2. बाजरीचे पीठ - १/४कप
  3. ज्वारीचे पीठ - १/४ कप
  4. पाणी - लागेल तसे कणीक मळण्यासाठी
  5. तूप - १ १/२ टेबलस्पून + ३-४ टेबलस्पून पराठ्याला लावण्यासाठी
  6. चवीनुसार मीठ
  7. तांदूळ पीठ किंवा गव्हाचे पीठ - २-३ टेबलस्पून. पोळपाटाला आणि पराठ्याला लावण्यासाठी
  8. सारणासाठी मशरूम - १ कप - एकदम बारीक करून घेतलेले किंवा मिक्सर ला एक पल्स देऊन काढलेले
  9. गाजर - बारीक चिरून - १/४ कप
  10. कोबी - १/२ एकदम बारीक करून घेतलेले किंवा मिक्सर ला एक पल्स देऊन काढलेले
  11. हिरवी शिमला मिरची - 1 मध्यम बारीक चिरून किंवा मिक्सर ला एक पल्स देऊन काढलेली
  12. लसूण पाकळ्या - 5-6 जाडसर वाटलेली 
  13. किसलेले आले - 1 टेबलस्पून
  14. हिरवा कांदा - 1/2 कप बारीक चिरून 
  15. हिरवी मिरची - ४-५ (जाडसर वाटलेली)
  16. शेझवान सॉस - १/२ टेबलस्पून
  17. किसलेले चीज - ३/४ कप
  18. तेल - १ टेबलस्पून
  19. चवीनुसार मीठ
  20. हिरव्या कांद्याची पात किंवा पाने - 2 टेबलस्पून बारीक चिरून सजावटीसाठी

सूचना

  1. कणिके साठी - एका मोठ्या खोल वाडग्यात किंवा परातीत सर्व पीठे घ्या. मीठ आणि तूप घालावे. पुरेसे पाणी घालून मिक्स करावे आणि नरम कणिक मळून घ्यावी.
  2. सारण - नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करावे. जाडसर वाटलेली लसूण घालावी. मोठ्या- मध्यम आचेवर काही सेकंद ढवळून घ्यावी.
  3. बारीक चिरलेला कांदा घालावा. पारदर्शक होईपर्यंत शिजवा. मिरची घालावी. काही सेकंद शिजवावी.
  4. सर्व भाज्या, मीठ घालावे. 3 ते 4 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. दरम्यान ढवळत राहा. पाणी पूर्णपणे सुकू द्या.
  5. शेझवान सॉस घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजवणे. ज्योत बंद करा मिश्रण थंड होऊ द्या.
  6. पराठा - कणिक 10-12 समान गोळ्यांमध्ये विभागून घ्या. तांदळाचे पीठ पोळपाटाला लावून बनवलेल्या गोळ्याची पातळ अशी चपाती किंवा पोळी साधारणतः (६-७"व्यास) लाटून घ्या.
  7. अशाच प्रकारे दुसरीही एक चपाती किंवा पराठा लाटून घ्या.
  8. 2 टेबलस्पून सारण आणि थोडे किसलेले चीज एका पराठ्यावर पसरवून घ्या.
  9. दुसऱ्या पराठ्याने तो झाकून घ्या. दोघांची किनारी एकत्र करा. फोर्क किंवा काटा चमच्यांचा वापर करून किनारी व्यवस्तिथ दाबून घ्या जेणे करून सारण बाहेर येणार नाही.
  10. नॉनस्टीक पॅन किंवा तव्यावर पराठा ठेवा. वर टिपके, बुडबुडे दिसू लागताच तो परतून घ्या. मध्यम आचेवर भाजून घ्या.
  11. परत परतून घ्या आणि काही सेकंद शिजवा. थोडे तूप घालावे.
  12. पुन्हा परता आणि तूप लावून चांगला दोन्ही बाजूनी तपकिरी रंग खरपूस भाजून घ्या. पलिता वापरून सगळ्या बाजूनी दाबून घ्या.
  13. ताटात काढून शेजवान चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर