फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित) | French Doughnuts or Beignets(Eggless) Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • French Doughnuts or Beignets(Eggless) recipe in Marathi,फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित), Sujata Hande-Parab
फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित)by Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  85

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित) recipe

फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make French Doughnuts or Beignets(Eggless) Recipe in Marathi )

 • मैदा - १ ३/४ कप (लहान) + २ टेबलस्पून (परातीला लावण्यासाठी किंवा पीठ मळताना लागत असेल तर वापरणे)
 • कोमट दूध - 3 टेबलस्पून 
 • साखर - १ किंवा २ टेबलस्पून + यीस्ट मिश्रणासाठी चिमूटभर
 • पिठी साखर - 1 टेबलस्पून ( डोनट्स वर भुरभुरण्यासाठी किंवा स्प्रिंकल करण्यासाठी)
 • मीठ - 1/4 टीस्पून
 • बेकिंग सोडा - १/२ टिस्पून
 • सुके यीस्ट - १ १/२ टीस्पून
 • दही - २ टेबलस्पून + २ टेबलस्पून कोमट पाणी
 • तळण्यासाठी तेल 

फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित) | How to make French Doughnuts or Beignets(Eggless) Recipe in Marathi

 1. कोमट दुधात साखर विरघळली (दुधाचे तापमान 35-40-अंश से असावे) की त्यात यीस्ट घाला. 5 मिनिटे बाजूला ठेवा.
 2. मैदा, बेकिंग सोडा एकत्र करा. मिठ घालावे. चांगले मिक्स करावे बाजूला ठेवा.
 3. एका वाडग्यात दही, पाणी आणि साखर घ्या. साखर विरघळेपर्यंत चांगले ढवळून घ्या. दूध, यीस्ट चे मिश्रण घालावे. ढवळून घ्यावे.
 4. मैदा मिश्रण घालून कणिक मळण्यास सुरुवात करावी. सुरुवातीला कणिक एकदम चिकट असेल. त्याला चांगले 7-8 मिनिटे मळून घ्यावे.
 5. मळलेली कणिक एका वाडग्यात घालून थोडे तेल लावून घ्यावे. प्लास्टिक ने किंवा मलमलच्या कपड्याने वाडगे झाकून ठेवा. 1 तासासाठी उबदार ठिकाणी ठेवा. कणिक फुलून दुप्पट किंवा तीनपट झाली पाहिजे.
 6. कणकेचा गोळा बाहेर काढून एखाद्या सपाट भागावर किंवा प्लॅटफॉर्मवर घ्यावा. बाहेर काढण्या आधी वर्क सरफेस वर सुके पीठ पसरवून घ्या.
 7. हाताच्या बोटानी हळुवारपणे सगळ्या बाजूनी दाबून घ्या.
 8. थोडे पीठ पसरवून तो ३मिमी जाड गोलाकार लाटून घ्या. २-३ मिनटे तसाच ठेवा.
 9. पिझ्झा कटर घ्या आणि त्याला १ १/२ इंच किंवा २ इंच चोकोना मध्ये कापून घ्या.
 10. जाड तळाच्या कढई मध्ये तेल गरम करावे. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचे आणि फुले पर्यंत बीग्नेट तळून घ्या.
 11. तेल नितळून, किचेन टॉवेलवर किंवा टिशु पेपर वर काढून घ्या.
 12. ताटात कडून त्यावर पिठी साखर स्प्रिंकल किंवा भुरभुरून चहा किंवा कॉफी बरोबर गरम सर्व्ह करा.

My Tip:

कणिक जास्त चिकट वाटत असल्यास आणखीन मैदा वापरू शकता. कणिक फार घट्ट नसावी.

Reviews for French Doughnuts or Beignets(Eggless) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo