मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित)

Photo of French Doughnuts or Beignets(Eggless) by Sujata Hande-Parab at BetterButter
0
4
0(0)
0

फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित)

Jul-14-2018
Sujata Hande-Parab
85 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेंच डोनट्स किंवा बीग्नेट (अंडाविरहित) कृती बद्दल

बीगनेट किंवा फ्रिटर किंवा फ्रेंच डोनट्स हि व्याख्या किंवा टर्म मुख्यतः चौक्स पेस्टरी फ्राय करून बनणाऱ्या डिश ला दिलेली आहे. हे सामान्यतः न्यू ऑर्लिन्स मध्ये बनवले आणि मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात आणि रवाळ साखर स्प्रिंकल करून सर्व्ह केले जातात. गरम कॉफी किंवा चहा बरोबर गरम गरम अतिशय स्वादिष्ट लागतात. मी हि डिश अंड्या ऐवजी दही वापरून केलेली आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • फ्रेंच
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

 1. मैदा - १ ३/४ कप (लहान) + २ टेबलस्पून (परातीला लावण्यासाठी किंवा पीठ मळताना लागत असेल तर वापरणे)
 2. कोमट दूध - 3 टेबलस्पून 
 3. साखर - १ किंवा २ टेबलस्पून + यीस्ट मिश्रणासाठी चिमूटभर
 4. पिठी साखर - 1 टेबलस्पून ( डोनट्स वर भुरभुरण्यासाठी किंवा स्प्रिंकल करण्यासाठी)
 5. मीठ - 1/4 टीस्पून
 6. बेकिंग सोडा - १/२ टिस्पून
 7. सुके यीस्ट - १ १/२ टीस्पून
 8. दही - २ टेबलस्पून + २ टेबलस्पून कोमट पाणी
 9. तळण्यासाठी तेल 

सूचना

 1. कोमट दुधात साखर विरघळली (दुधाचे तापमान 35-40-अंश से असावे) की त्यात यीस्ट घाला. 5 मिनिटे बाजूला ठेवा.
 2. मैदा, बेकिंग सोडा एकत्र करा. मिठ घालावे. चांगले मिक्स करावे बाजूला ठेवा.
 3. एका वाडग्यात दही, पाणी आणि साखर घ्या. साखर विरघळेपर्यंत चांगले ढवळून घ्या. दूध, यीस्ट चे मिश्रण घालावे. ढवळून घ्यावे.
 4. मैदा मिश्रण घालून कणिक मळण्यास सुरुवात करावी. सुरुवातीला कणिक एकदम चिकट असेल. त्याला चांगले 7-8 मिनिटे मळून घ्यावे.
 5. मळलेली कणिक एका वाडग्यात घालून थोडे तेल लावून घ्यावे. प्लास्टिक ने किंवा मलमलच्या कपड्याने वाडगे झाकून ठेवा. 1 तासासाठी उबदार ठिकाणी ठेवा. कणिक फुलून दुप्पट किंवा तीनपट झाली पाहिजे.
 6. कणकेचा गोळा बाहेर काढून एखाद्या सपाट भागावर किंवा प्लॅटफॉर्मवर घ्यावा. बाहेर काढण्या आधी वर्क सरफेस वर सुके पीठ पसरवून घ्या.
 7. हाताच्या बोटानी हळुवारपणे सगळ्या बाजूनी दाबून घ्या.
 8. थोडे पीठ पसरवून तो ३मिमी जाड गोलाकार लाटून घ्या. २-३ मिनटे तसाच ठेवा.
 9. पिझ्झा कटर घ्या आणि त्याला १ १/२ इंच किंवा २ इंच चोकोना मध्ये कापून घ्या.
 10. जाड तळाच्या कढई मध्ये तेल गरम करावे. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचे आणि फुले पर्यंत बीग्नेट तळून घ्या.
 11. तेल नितळून, किचेन टॉवेलवर किंवा टिशु पेपर वर काढून घ्या.
 12. ताटात कडून त्यावर पिठी साखर स्प्रिंकल किंवा भुरभुरून चहा किंवा कॉफी बरोबर गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर