नाचणी नानकटाई | Nachani nankatai Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Nachani nankatai recipe in Marathi,नाचणी नानकटाई, Shilpa Deshmukh
नाचणी नानकटाईby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

नाचणी नानकटाई recipe

नाचणी नानकटाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nachani nankatai Recipe in Marathi )

 • 1 वाटी नाचणी पीठ
 • 1/4 वाटी कणिक
 • 1/2 वाटी गूळ किसून किंवा पवाडर
 • गाईचे तूप 1/4 कप
 • बेकिंग पावडर 1/2 tbsp
 • बेकिंग सोडा 1/2 tbsp
 • बदाम 5-6
 • वेलची पावडर 1 tbsp
 • दूध 4 चमचे
 • बदाम

नाचणी नानकटाई | How to make Nachani nankatai Recipe in Marathi

 1. सगळे साहित्य जमवून घ्या .नाचणीला कधीही कीड लागत नाही. दोन-तीन वर्षांचे नाचणीचे धान्य स्वादासकट चांगले टिकते. नाचणीचे सत्त्व पूर्वी घरोघर लहान बालकांना देण्यात यायचे नाचणी पित्तशामक, थंड, तृप्तीकारक व रक्तातील तीक्ष्ण, उष्ण हे फाजील दोष कमी करते
 2. दोन्ही पीठ आणि गूळ एकजीव होईपर्यंत मिक्स करा . हाताने दाबल्यावर गोळा होईल इतपत मिक्स करा .
 3. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला मिक्स करा .
 4. तूप घालून मळून घ्या ,वेलची पावडर आणि थोडं थोडं दूध घालून पिठाचा गोळा घट्ट बनेल इतपत हातानी मळून घ्या.
 5. गुळाला पाणी सुटतं त्यामुळे दूध घालतांना एकदम घाई करू नका आवश्यक तेवढेच घाला.
 6. उंड्याचे छोटे छोटे गोळे पेठ्याप्रमाणे करून वरून थोडं प्रेस करून बेकिंग ट्रे मध्ये ठेवा.
 7. मायक्रोवेव्ह 180° प्रीहीट करा
 8. वरून बदामाचे काप चिपकवा .
 9. 20 मिनिट सेट करून बेक करायला ठेवा .ट्रेमध्ये बिस्कीट किंवा कुकीज ठेवतांना आजूबाजूला थोडी मोकळी जागा असू द्या .
 10. कारण कुकीज बेक होतांना त्यांचं आकारमान वाढतं
 11. वीस मिनिटांनी कुकीज बाहेर काढा आणि पौष्टिक नाचणी नानकटाई चा आनंद घ्या.
 12. चवीला अप्रतिम आणि पौष्टिकही शिवाय तिन्ही दोषांचे निवारण करते .

Reviews for Nachani nankatai Recipe in Marathi (0)