भोपाळ्याचे मिनी थालीपीठ | Pumpkin Mini Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pumpkin Mini Thalipith recipe in Marathi,भोपाळ्याचे मिनी थालीपीठ, Renu Chandratre
भोपाळ्याचे मिनी थालीपीठby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

भोपाळ्याचे मिनी थालीपीठ recipe

भोपाळ्याचे मिनी थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pumpkin Mini Thalipith Recipe in Marathi )

 • ज्वारीचे पीठ १ मोठा चमचा
 • मक्याचे पीठ १ मोठा चमचा
 • तांदुळाचे पीठ १ मोठा चमचा
 • किसलेला भोपळा २ वाटी
 • बारीक चिरलेला कांदा १ मोठा चमचा
 • तीळ ४ छोटे चमचे
 • ओवा १ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • हिरवी मिरची चे तुकडे २ चमचे
 • हळद - तिखट चवीनुसार
 • तेल गरजेनुसार

भोपाळ्याचे मिनी थालीपीठ | How to make Pumpkin Mini Thalipith Recipe in Marathi

 1. एका परातीत ज्वारीचे पीठ, तांदुळाचे पीठ , मक्याचे पीठ, कांदा आणि कीसलेला भोपळा घाला
 2. त्यात मीठ , हळद, तिखट , मिर्ची चे तुकडे, तीळ ओवा घालावे
 3. व्यवस्थित मिक्स करा
 4. थोडे तयार पीठ हातावर घ्या आणि त्याचे थालिपीठ तयार करा
 5. मधोमध भोक करा
 6. किंवा डायरेक्ट तवा वर पण थालीपीठ करू शकता
 7. तवा गरम करून त्यावर थालीपीठ टाका
 8. गरजेनुसार तेल घालून , थालीपीठ खमंग खरपूस भाजुन घ्यावेत
 9. गरमा गरम थालीपीठ दही, मिरची , कांदा व लसणाची सुकी चटणी सोबत सर्व्ह करावे

Reviews for Pumpkin Mini Thalipith Recipe in Marathi (0)