वाटाण्याची कूकी | Green peas cookie Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green peas cookie recipe in Marathi,वाटाण्याची कूकी, Archana Chaudhari
वाटाण्याची कूकीby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

3

0

वाटाण्याची कूकी recipe

वाटाण्याची कूकी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green peas cookie Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ १ कप
 • ओट्स भाजून बनवलेली पावडर १ कप
 • जवस पावडर २ टेबलस्पून
 • बेकिंग सोडा १ टीस्पून
 • मीठ चिमूटभर
 • बटर १/२ कप सामान्य तापमानाचे
 • साखर १/२ कप
 • ताजे हिरवे वाटणे १/२ कप (पेस्ट केलेली)
 • व्हॅनिला एसेन्स १ टीस्पून
 • पाणी १/४ कप
 • बदामाचे काप २ टेबलस्पून

वाटाण्याची कूकी | How to make Green peas cookie Recipe in Marathi

 1. एका भांड्यात गहू पीठ, ओट्सचे पीठ,बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करा.
 2. एका छोट्या वाटीमध्ये जवस पावडर आणि पाणी एकत्र करा.१० मिनिटे ठेवा.
 3. आता दुसऱ्या एका भांड्यात वाटाण्याची पेस्ट,साखर, आणि व्हॅनिला एसेन्स एकत्र करून ठेवा.
 4. वरील कोरडे मिश्रण आणि दोन्ही ओले मिश्रण एकत्र करा.
 5. छान मिसळल्यावर त्याचे छोटे छोटे(१ टेबलस्पून) गोळे करून घ्या.
 6. आता बेकिंग ट्रे वर बटर पेपर पसरवून वरील गोळे पेपर वर ठेवा.
 7. खूप जास्त जवळ जवळ ठेवू नका.
 8. आता फोर्क च्या साहाय्याने थोडेसे दाबून मध्ये बदामाचे काप लावा.
 9. १८० अंश सेंटिग्रेड प्रिहीट ओव्हन मध्ये १८० अंश सेंटिग्रेड ला २० ते २५ मिनिटे बेक करा.

My Tip:

तुम्ही व्हॅनिला एसेन्स ऐवजी इलायची पावडर वापरू शकता.

Reviews for Green peas cookie Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती