दराब्याचे लाडू | Darabyache ladu Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Darabyache ladu recipe in Marathi,दराब्याचे लाडू, Smita Koshti
दराब्याचे लाडूby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

दराब्याचे लाडू recipe

दराब्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Darabyache ladu Recipe in Marathi )

 • 250ग्रॅम रवा
 • 125 ग्रॅम मैदा
 • 125 ग्रॅम बेसन
 • 500 ग्रॅम पिठी साखर
 • 400 ग्रॅम साजूक तुप
 • बदामाचे काप सजावटीसाठी

दराब्याचे लाडू | How to make Darabyache ladu Recipe in Marathi

 1. कढईत तुप गरम करून आधी रवा घालून एक मिनिट परता.
 2. लगेच त्यात एका मिनिटात मैदा व बेसन घालून चांगले गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या .
 3. खमंग वास सुटला की गॅस बंद करा. भाजल्यावर पीठ तुप सोडून पातळ होते.
 4. गॅस बंद केल्यावर लगेच कढई उतरवून ठेवा. गरम बर्नरवर पीठ जळू शकते.
 5. थंड झाल्यावर त्यात साखर कालवून रात्रभर मुरत ठेवा.
 6. सकाळी ह्या पीठाला दोन्ही हाताने चोळून चांगले फेसावे. व लाडू बांधावे. किंवा वड्या पाडा. बदामाचे काप लावा. व सर्व्ह करा.
 7. आपण हे पीठ मिक्सर मध्येही फिरवून फेसू शकतो. पण हातांवर रगडून पीठ फेसले तर लाडू जास्त मऊ,हलके व चवदार होतात.

My Tip:

वातावरणानुसार फेसलेले पीठ पातळ होवू शकते त्यानुसार थोडे पीठ भाजून घाला.

Reviews for Darabyache ladu Recipe in Marathi (0)