मुख्यपृष्ठ / पाककृती / दराब्याचे लाडू

Photo of Darabyache ladu by Smita Koshti at BetterButter
0
4
0(0)
0

दराब्याचे लाडू

Jul-14-2018
Smita Koshti
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दराब्याचे लाडू कृती बद्दल

हे लाडू लगेच तयार होतात. छान जमले तर पेढ्यासारखे लागतात. कोणत्याही सणावाराच्यानिमित्ताची ह्याला गरज नाही. घरी उपलब्ध साहित्य वापरून बनवलेला पदार्थ आहे. जो गोड घश्यांना पोटभरीचा आहे. नक्की करून बघा.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 250ग्रॅम रवा
 2. 125 ग्रॅम मैदा
 3. 125 ग्रॅम बेसन
 4. 500 ग्रॅम पिठी साखर
 5. 400 ग्रॅम साजूक तुप
 6. बदामाचे काप सजावटीसाठी

सूचना

 1. कढईत तुप गरम करून आधी रवा घालून एक मिनिट परता.
 2. लगेच त्यात एका मिनिटात मैदा व बेसन घालून चांगले गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या .
 3. खमंग वास सुटला की गॅस बंद करा. भाजल्यावर पीठ तुप सोडून पातळ होते.
 4. गॅस बंद केल्यावर लगेच कढई उतरवून ठेवा. गरम बर्नरवर पीठ जळू शकते.
 5. थंड झाल्यावर त्यात साखर कालवून रात्रभर मुरत ठेवा.
 6. सकाळी ह्या पीठाला दोन्ही हाताने चोळून चांगले फेसावे. व लाडू बांधावे. किंवा वड्या पाडा. बदामाचे काप लावा. व सर्व्ह करा.
 7. आपण हे पीठ मिक्सर मध्येही फिरवून फेसू शकतो. पण हातांवर रगडून पीठ फेसले तर लाडू जास्त मऊ,हलके व चवदार होतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर