चेस बोर्ड कुकीज | chess board cookies Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • chess board cookies recipe in Marathi,चेस बोर्ड कुकीज, Pranali Deshmukh
चेस बोर्ड कुकीजby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

चेस बोर्ड कुकीज recipe

चेस बोर्ड कुकीज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make chess board cookies Recipe in Marathi )

 • मैदा 200gr.
 • पिठी साखर 120gr.
 • कोको पावडर 20gr.
 • बटर 200gr. रूम टेम्परेचर वर
 • व्हॅनिला इसेन्स 1 tbs
 • दूध 2 tbs
 • मीठ किंचित
 • बेकिंग पावडर 1 tbs

चेस बोर्ड कुकीज | How to make chess board cookies Recipe in Marathi

 1. एका बाउल मध्ये बटर आणि साखर इलेक्ट्रिक बिटरने बिट करून घ्या
 2. मैदा ,बेकिंग पावडर मिक्स करा
 3. बटर मध्ये थोडी थोडी कणिक मिक्स करा .
 4. पीठ हातानी मळून घ्या .आणि पिठाचे सारखे दोन भाग करा .एका भागात कोको पावडर मिक्स करा.
 5. लाटण्याने दोन्ही गोळे फ्लॅट करून घ्या एक चौकोनी किंवा आयताकृती आकार देऊन सिलिकॉन पेपरमध्ये रॅप करून 20 मिनिट फ्रिजमध्ये ठेवा.
 6. आता दोन्ही शीटच्या 2 सेमीच्या पट्ट्या कापून घ्या
 7. एक पांढरी एक ब्राऊन या क्रमाने तीन किंवा चार पट्ट्या जोडा
 8. जोडतांना थोडं दूध लावा
 9. आता एकावर एक असे फ्लोर तयार करा
 10. रॅप करून 20 मिनिट परत फ्रिजमध्ये ठेवा .
 11. आता सुरीने चित्रात दाखविल्याप्रमाणे कुकीज कापून घ्या
 12. मायक्रोवेव्ह 180°प्रीहीट करा ट्रे मध्ये बटर पेपर ठेवा ,कुकीज थोड्या दूर दूर ठेवा आणि 15 मिनिट सेट करून बेक करा.
 13. बेक झाल्यावर कुलिंग रॅकवर ठेवा आणि थंड झाल्यावर तोंडात टाकताच विरघळनाऱ्या कुकीज एन्जॉय करा.

Reviews for chess board cookies Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo