नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्या | Nachanichya chakalya Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Nachanichya chakalya recipe in Marathi,नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्या, Aarya Paradkar
नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्याby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्या recipe

नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nachanichya chakalya Recipe in Marathi )

 • 1 वाटी नाचणी पिठ
 • 1/2वाटी गव्हाचे पिठ
 • 1/2 वाटी ज्वारीचे पिठ
 • 1/2 वाटी मुगाची डाळ
 • 2 चमचे तिखट
 • 2 चमचे तिळ
 • 1 चमचा ओवा
 • 1/2 चमचा हळद
 • पाव चमचा हिंग
 • चवीनुसार मीठ
 • तळण्यासाठी तेल

नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्या | How to make Nachanichya chakalya Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व पीठे एकत्रित करणे
 2. नंतर त्यात तिखट मीठ, हिंग हळद
 3. तिळ, ओवा घालणे
 4. व हे मिश्रण स्वच्छ कापडात बांधून घणे
 5. मूग डाळ धुऊन ती शिजले ऐवढे त्यात पाणी घालावे
 6. कुकरमध्ये प्रथम डाळीचा डबा ठेवणे त्यावर पिठांचे गाठोडे बांधलेला डबा ठेवणे(त्यात पाणी घालू नये,फक्त वाफवायचे आहे)
 7. कूकरच्या 3 शिट्ट्या काढणे
 8. पिठाचा दगडा सारखा गोळा फोडून परत त्याचे पिठ करणे
 9. त्यात शिजवलेले मूग डाळीचे वरण घालून मळणे
 10. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून मळून घ्यावे
 11. चकल्या पाडून मंद आचेवर तळून घ्यावे

My Tip:

यात मोहन घालण्याची गरज नाही

Reviews for Nachanichya chakalya Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo