पुट्टु | Puttu Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Puttu recipe in Marathi,पुट्टु, Sharwari Vyavhare
पुट्टुby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

पुट्टु recipe

पुट्टु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puttu Recipe in Marathi )

 • तांदळाचे पिठ १ वाटी
 • आले खिसलेले खोबरे १ / ४ वाटी
 • चवी प्रमाणे मिठ
 • जिरे पावडर चवीला

पुट्टु | How to make Puttu Recipe in Marathi

 1. एका भांडया मध्ये तांदळाचे पिठ व खोबरे घ्या व मिक्स करा
 2. त्या मध्ये जिरे पावडर व मिठ घाला व मिक्स करून घ्या
 3. मिश्रणा मध्ये १ कप पाणी घालून मिक्स करा
 4. इतक्या प्रमाणास १ कप पाणी पुरे होते
 5. पुट्टुचे मिश्रण पातळ नाही करायचे
 6. मिश्रण ओलसर करून घ्यावे
 7. पुट्टु यंत्राच्या खालच्या भागा मध्ये पाणी घाला
 8. वरच्या भागा मध्ये आपण बनवलेले मिश्रण भरा
 9. पुट्टु यंत्राचा वरचा भाग खालच्या भागावर ठेवून दया
 10. हे यंत्र २० मि मध्यम गॅस वर ठेवा व पुट्टु बनवुन घ्या
 11. गरमगरम पुट्टु वर तुप टाका
 12. सांबर सोबत सव्र्ह करा

My Tip:

तुम्ही मिश्रणात तिखट, हिरवी मिरची, कोंथीबीर घालुन पण पुटुटु बनवू शकता व तुपा सोबत खाऊ शकता

Reviews for Puttu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo