तांदळाची भाकरी (उकडीच्या) | Rice Flour Bhakari Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rice Flour Bhakari recipe in Marathi,तांदळाची भाकरी (उकडीच्या), Sujata Hande-Parab
तांदळाची भाकरी (उकडीच्या)by Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

तांदळाची भाकरी (उकडीच्या) recipe

तांदळाची भाकरी (उकडीच्या) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice Flour Bhakari Recipe in Marathi )

 • तांदळाचे पीठ - १ १/२ कप (चांगल्या दर्जाची, बासमती किंवा कोणत्याही तांदळाचे किंवा कणीचे पिठ)
 • तूप / तेल - 1/2 टेबलस्पून (वैकल्पिक)
 • चवीनुसार मीठ
 • पाणी - 1 कप किंवा लागेल तसे 

तांदळाची भाकरी (उकडीच्या) | How to make Rice Flour Bhakari Recipe in Marathi

 1. एका पॅन मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ आणि तेल किंवा तूप घालावे. पाण्याला उकळी येऊ द्यावी. त्यात तांदळाचे पीठ हळूहळू टाकून मिक्स करावे.
 2. कणिक एकत्र येईपर्यंत व्यवस्तिथ मिक्स करावे. कमी ज्योत वर हे करा. कणीक थोडं चिकट असल्यास पिठ घाला आणि चांगले मिक्स करावे. गॅस बंद करून पॅन ५ मिनीट झाकून ठेवा.
 3. हाताला साधे पाणी लावून कणिक थोडी नरम मळून घ्या. कणकेचे ८-१० समान गोळे करा.
 4. एक गोळा घेऊन तो हाताने थोडा दाबून घ्या. पोळपाटाला आणि बनवलेल्या भाकरीच्या गोळ्याला थोडेसे सुके पीठ लावून घ्या.
 5. लाटण्याने हळू हळू लाटून घ्या किंवा हाताच्या बोटानी भाकरी हळू हळू सगळ्या बाजूनी दाबून (४-५ इंच व्यास) चपाती सारखा गोल आकार द्या. लागत असल्यास सुख्या पिठाचा वापर करा.
 6. आधीच गरम केलेल्या तव्यावर किंवा पॅनवर अलगद टाका. वरून थोडे पाणी लावून घ्या. वर बुडबुडे दिसू लागताच तो परतून घ्या. मध्यम आचेवर भाजून घ्या.
 7. परत परतून घ्या आणि काही सेकंद भाजू द्या. पुन्हा परता आणि दोन्ही बाजूनी व्यवस्तिथ भाजून घ्या.
 8. एखादा स्वच्छ कपडा किंवा पलिता वापरून भाकरीच्या कडा दाबून तिला व्यवस्तिथ फुगू द्या.
 9. भाकरी फुगली कि ताटात काढून गरमा गरम सर्व्ह करा.

My Tip:

कणिक मळताना पाण्याची गरज लागत असल्यास गरम पाणी टाकावे. किंवा पीठ जास्त नरम वाटत असल्यास अधिक पीठ वापरावे.

Reviews for Rice Flour Bhakari Recipe in Marathi (0)