ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले) | Jwar(Sorghum) and banana muffins(eggless) Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jwar(Sorghum) and banana muffins(eggless) recipe in Marathi,ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले), Archana Chaudhari
ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले)by Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

3

0

About Jwar(Sorghum) and banana muffins(eggless) Recipe in Marathi

ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले) recipe

ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jwar(Sorghum) and banana muffins(eggless) Recipe in Marathi )

 • ज्वारीचे पीठ ३/४ कप
 • पिकलेले केळी कुस्करून ३/४ कप
 • पिठी साखर ४ टेबलस्पून
 • व्हॅनिला एस्सेन्स १/२ टीस्पून
 • मीठ चिमूटभर
 • बेकिंग पावडर १/२ टीस्पून
 • बेकिंग सोडा १/२ टीस्पून
 • तेल १/४ कप (वास नसलेले)
 • बदाम काप १ टेबलस्पून
 • भोपळ्याच्या बियांचा चुरा(भाजलेल्या) १टेबलस्पून

ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले) | How to make Jwar(Sorghum) and banana muffins(eggless) Recipe in Marathi

 1. ज्वारीचे पीठ,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,मीठ एकत्र करून चाळणीने दोन वेळेस चाळून घ्या.
 2. एका भांड्यात कुस्करलेली केळी आणि
 3. तेल,साखर, व्हॅनिला इसेन्स एकत्र करून बीटर ने बीट करून घ्या.(चमच्याने केले तरीही चालेल)
 4. आता बीट केलेल्या मिश्रणात दोनदा चाळून घेतलेले पीठ हळू हळू टाकून हलकेच एकत्र करा.
 5. खूप जास्त वेळ नका करू.आपले बॅटर तयार आहे.
 6. आता पेपर चे माफिन्स कप मफिन ट्रे वर ठेवा.
 7. ओव्हन १८० अंश सेंटिग्रेड ला तापत ठेवा.
 8. तयार बॅटर चे मिश्रण माफिन्स कप मध्ये ३/४ भरेल एव्हढेच टाका.(त्यांना फुलण्यासाठी जागा हवी म्हणून)
 9. वरून बदामाचे काप,भोपळ्याच्या बियांचा चुरा टाका.
 10. १८० अंश सेंटिग्रेड तापमानाला २० मिनिटे बेक करा.
 11. टूथपीक टाकून तपासा, मफिन चे बॅटर टूथपीक ला नाही चिकटले पाहिजे.
 12. ओव्हनच्या बाहेर काढून रॅक वर गार होऊ द्या.
 13. गरम गरम चहा सोबत हेल्दी माफिन्स खा. :blush:

My Tip:

भोपळ्याच्या बिया पौष्टीक असतात म्हणून मी त्या वापरल्या, तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता.

Reviews for Jwar(Sorghum) and banana muffins(eggless) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo