मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले)

Photo of Jwar(Sorghum) and banana muffins(eggless) by archana chaudhari at BetterButter
1018
2
0.0(0)
0

ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले)

Jul-15-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी आणि केळ्याचे माफिन्स (अंडे नसलेले) कृती बद्दल

आज मी अंडे न वापरता ज्वारीचे पीठ आणि केळ्याचे माफिन्स बनविले आहेत.तुम्ही नक्की करून पहा हे हेल्दी मफिन्स.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. ज्वारीचे पीठ ३/४ कप
  2. पिकलेले केळी कुस्करून ३/४ कप
  3. पिठी साखर ४ टेबलस्पून
  4. व्हॅनिला एस्सेन्स १/२ टीस्पून
  5. मीठ चिमूटभर
  6. बेकिंग पावडर १/२ टीस्पून
  7. बेकिंग सोडा १/२ टीस्पून
  8. तेल १/४ कप (वास नसलेले)
  9. बदाम काप १ टेबलस्पून
  10. भोपळ्याच्या बियांचा चुरा(भाजलेल्या) १टेबलस्पून

सूचना

  1. ज्वारीचे पीठ,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,मीठ एकत्र करून चाळणीने दोन वेळेस चाळून घ्या.
  2. एका भांड्यात कुस्करलेली केळी आणि
  3. तेल,साखर, व्हॅनिला इसेन्स एकत्र करून बीटर ने बीट करून घ्या.(चमच्याने केले तरीही चालेल)
  4. आता बीट केलेल्या मिश्रणात दोनदा चाळून घेतलेले पीठ हळू हळू टाकून हलकेच एकत्र करा.
  5. खूप जास्त वेळ नका करू.आपले बॅटर तयार आहे.
  6. आता पेपर चे माफिन्स कप मफिन ट्रे वर ठेवा.
  7. ओव्हन १८० अंश सेंटिग्रेड ला तापत ठेवा.
  8. तयार बॅटर चे मिश्रण माफिन्स कप मध्ये ३/४ भरेल एव्हढेच टाका.(त्यांना फुलण्यासाठी जागा हवी म्हणून)
  9. वरून बदामाचे काप,भोपळ्याच्या बियांचा चुरा टाका.
  10. १८० अंश सेंटिग्रेड तापमानाला २० मिनिटे बेक करा.
  11. टूथपीक टाकून तपासा, मफिन चे बॅटर टूथपीक ला नाही चिकटले पाहिजे.
  12. ओव्हनच्या बाहेर काढून रॅक वर गार होऊ द्या.
  13. गरम गरम चहा सोबत हेल्दी माफिन्स खा.:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर