मुख्यपृष्ठ / पाककृती / उडदाच्या पिठाचे डांगर

Photo of Dangar (Split Black Lentil) by Sujata Hande-Parab at BetterButter
1577
5
0.0(0)
0

उडदाच्या पिठाचे डांगर

Jul-15-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडदाच्या पिठाचे डांगर कृती बद्दल

उडीद डाळ, भाजलेले जिरे आणि हिंग एकत्र करून त्याचे पीठ बनवून ते दीर्घ काळासाठी हवाबंद कंटेनरमध्ये साठवून ठेवतात नि जेव्हा लागेल तेव्हा वापरतात. तसेच, डांगरचे पिठा महाराष्ट्र कोकणातही सहज उपलब्ध आहे. हे तयार करणे खूप सोपे आहे आणि डाळ तांदूळ किंवा चपाती किंवा भाकरी बरोबर खाल्ले जाते. महाराष्ट्रात हि डिश मोठ्या आवडीने खाल्ली जाते. अतिशय पोषक आणि करण्यास फारच सोपी आहे. कोकणात काळे उडीद भाजून ते जाताई वर भरडून, पाखडून घेऊन जी डाळ येत असे त्यापासून उडदाचे पीठ बनवले जात असे. आता पीठ चक्की वर किंवा घरघंटी वर दळून घेतले जाते. जाताईंवर बनवलेल्या पिठाची चव वेगळी आणि अप्रतिम आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजलेल्या उडीद डाळीचे पीठ - १/२ कप
  2. कांदा मध्यम - १ बारीक चिरून
  3. लाल तिखट - १/२ टीस्पून 
  4. स्वादानुसार मीठ
  5. कोथिंबीर पाने - १-२ टेबलस्पून बारीक चिरून
  6. पाणी आवश्यकतेनुसार.

सूचना

  1. एका वाडग्यात उडीद डाळ पीठ घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर पाने, लाल तिखट, मीठ घालावे. चांगले मिक्स करावे.
  2. २-३ टेबलस्पून किंवा लागेल तसे साधे पाणी हळू हळू घालून घट्ट डांगर बनवून घ्यावे. जास्त पाणी घालू नये.
  3. गरमा गरम भाकरी किंवा डाळभात बरोबर सर्व्ह करावे.
  4. काही ठिकाणी दही घालून हि सर्व्ह केले जाते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर