मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअन

Photo of Bajari pithache healthy manchurian by Pranali Deshmukh at BetterButter
1065
2
0.0(0)
0

बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअन

Jul-15-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअन कृती बद्दल

बाजरी हि पचायला हलकी असते मुलांना मन्चुरिअन खूप आवडते जर आपण थोड्या वेगळ्या प्रकाराने करून बघितलं तर ! खूप पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे.हि

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप बाजरीचे पीठ
  2. 1/2 कप मोड आलेले मूग
  3. 1/2 कप मेथीची पान
  4. 1 tbs अद्रक लसूण पेस्ट
  5. 1 कांदा बारीक कापून
  6. 2 हिरव्या मिरच्या कापून
  7. 1/4 tbs हिंग
  8. 1 tbs मोहरी
  9. 1 tbs जिरे
  10. 1 tbs तेल
  11. 1/2 tbs हळद
  12. 1 tbs तिखट
  13. 1 tbs लिंबाचा रस
  14. 1 tbs साखर .

सूचना

  1. पिठात मीठ घाला आणि कोमट पाण्याने पीठ घट्ट भिजवून घ्या .
  2. 5 मिनिट झाकून ठेवा आता हाताला थोडं तेल लावून पिठाचे छोटे छोटे बॉल करा .
  3. आता हे बॉल इडली पात्रात 20 मिनिट स्टीम करून घ्या .
  4. कढईत तेल टाका तेल तापलं कि मोहरी जिरे हिंग घाला कांदा लसूण अद्रक छान परतवून घ्या
  5. तिखट मीठ हळद घाला
  6. आता मोड आलेले मूग घाला
  7. आता मेथी घाला आणि छान मिक्स करून घ्या .
  8. थोडं पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिट शिजू द्या
  9. आता वाफवलेले बाजरी पिठाचे बॉल घाला
  10. लिंबाचा रस साखर घालून मिक्स करा 5 मिनिट झाकण ठेवून वाफ काढा .
  11. कोथिंबीर भुरभुरून सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर