मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पिठाचे थालीपीठ

Photo of Mix flour thalipeeth by Manisha Sanjay at BetterButter
1481
1
0.0(0)
0

मिक्स पिठाचे थालीपीठ

Jul-15-2018
Manisha Sanjay
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पिठाचे थालीपीठ कृती बद्दल

भाजणी शिवाय पटकन होणारे थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारी पीठ - एक वाटी
  2. गव्हाचे पीठ - अर्धा वाटी
  3. तांदूळ पीठ - पाव वाटी
  4. बेसन पीठ - पाव वाटी
  5. तीळ - २ छोटे चमचे
  6. कांदा किसून - १ वाटी
  7. हळद - १/२ छोटा चमचा
  8. कोथिंबीर चिरून - १/२ वाटी
  9. जिरे पूड - १/२ छोटा चमचा
  10. ओवा - १/२ छोटा चमचा
  11. मीठ चवी नुसार
  12. हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
  13. तेल लागेल असे
  14. पाणी लागेल असे

सूचना

  1. सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
  2. त्यात हळूहळू पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. पीठ भाकरी साठी मळतो असे असावे.
  3. पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे.
  4. पोळपाट वर ओला सुती कपडा घेऊन त्या वर हाताने थालीपीठ थापावे.
  5. थालीपीठ कपड्या सह गरम तव्यावर टाकावे आणि कापड काढून घ्यायचे.
  6. तेल घालून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.
  7. असेच सर्व थालीपीठ करून घ्या.
  8. लोणी/दही/ चटणी सोबत खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर