तांदळाच्या पिठाचे धिरडे व गव्हाच्या पिठाची गुळवणी | Tandalache ghavan Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tandalache ghavan recipe in Marathi,तांदळाच्या पिठाचे धिरडे व गव्हाच्या पिठाची गुळवणी, Aarya Paradkar
तांदळाच्या पिठाचे धिरडे व गव्हाच्या पिठाची गुळवणीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

तांदळाच्या पिठाचे धिरडे व गव्हाच्या पिठाची गुळवणी recipe

तांदळाच्या पिठाचे धिरडे व गव्हाच्या पिठाची गुळवणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tandalache ghavan Recipe in Marathi )

 • 1 वाटी तांदळाचे पीठ
 • 1/2 वाटी गव्हाचे पीठ
 • 1/2 वाटी दूध
 • 1/2 वाटी गूळ
 • 1 चमचा वेलची पूड
 • चिमुटभर मीठ

तांदळाच्या पिठाचे धिरडे व गव्हाच्या पिठाची गुळवणी | How to make Tandalache ghavan Recipe in Marathi

 1. तांदळाचे पिठ व चिमुटभर मीठ घालून चांगले सरबरीत भिजविणे
 2. गुठळी होऊ देऊ नये
 3. गुळवणी तयार करण्यासाठी
 4. गॅस वर एका भांड्यात 1/2 लिटर पाणी , गुळ व वेलची पूड घालून उकळी येऊ द्यावी
 5. कणकेत पाणी घालून सरबरीत भिजविणे
 6. व उकळलेल्या गोड पाण्यात हे पिठ घालून चांगले उकळणे
 7. गॅस बंद करून दुध घालून हलवून घेणे
 8. नंतर घावण/धिरडी करण्यासाठी
 9. तवा गरम करून त्यावर वरील भिजवून ठेवलेल्या तांदळाचे पिठाचे धिरडे / घावण घालणे
 10. गुळवणी व घावण खाण्यासाठी तयार

Reviews for Tandalache ghavan Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo