मुख्यपृष्ठ / पाककृती / मालवणी वडे

Photo of Malvani vade by Manisha Sanjay at BetterButter
2136
16
0.0(0)
0

मालवणी वडे

Jul-15-2018
Manisha Sanjay
180 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मालवणी वडे कृती बद्दल

भाजणी शिवाय पटकन होणारे मालवणी वडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारी पीठ - १/२ वाटी
  2. गव्हाचे पीठ - १/२ वाटी
  3. बेसन पीठ - १/४ वाटी
  4. तांदूळ पीठ - १/२ वाटी
  5. उडीद डाळ - १/४ वाटी
  6. मेथी दाणे - १ छोटा चमचा
  7. धणे - १ छोटा चमचा
  8. हळद - १/२ छोटा चमचा
  9. कांदा चिरुन - १/२ वाटी
  10. जिरे - १/२ छोटा चमचा
  11. मिठ चवीनुसार
  12. कोथिंबीर चिरून - १/४ वाटी
  13. हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
  14. तेल तळण्यासाठी
  15. पाणी लागेल असे

सूचना

  1. प्रथम उडीद डाळ, मेथी दाणे २ तास भिजत घालून ठेवा.
  2. २ तासा नंतर डाळ, मेथी दाणे, धणे, जिरे, कांदा बारीक वाटून घ्या.
  3. सर्व पिठे, वाटलेले मिश्रण, हळद, मीठ, मिरची पेस्ट आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. पीठ भाकरी च्या पिठा सारखे असले पाहिजे.
  4. पोळपाट वर ओला सुती कपडा घेऊन त्या वर हाताने छोटे छोटे वडे करून घ्या.
  5. कढई मध्ये तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर वडे तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर