ज्वारी च्या पिठाचे उत्तअपपम | Jowar flour uttapam Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Jowar flour uttapam recipe in Marathi,ज्वारी च्या पिठाचे उत्तअपपम, Manisha Sanjay
ज्वारी च्या पिठाचे उत्तअपपमby Manisha Sanjay
  • तयारी साठी वेळ

    14

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    7

    माणसांसाठी

5

0

ज्वारी च्या पिठाचे उत्तअपपम recipe

ज्वारी च्या पिठाचे उत्तअपपम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jowar flour uttapam Recipe in Marathi )

  • ज्वारी चे पीठ - ३ वाटी
  • उडीद डाळ - १ वाटी
  • मेथी दाणे - १/२ टेबलस्पून
  • मीठ चवी नुसार
  • पाणी लागेल असे
  • तेल लागेल असे

ज्वारी च्या पिठाचे उत्तअपपम | How to make Jowar flour uttapam Recipe in Marathi

  1. प्रथम उडीद डाळ + मेथी दाणे दोन तास भिजत घालून ठेवा.
  2. दोन तासा नंतर बारीक वाटून घ्या . त्यात तीन वाटी ज्वारी चे पीठ, पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. पीठ डोसा पीठ पेक्षा घट्ट आणि इडली पीठ पेक्षा पातळ असले पाहिजे. चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. हे पीठ दहा ते बारा तास आंबवायला ठेवा.
  3. पीठ चांगले आंबले की मिनी उत्तअपपम तवा वर उत्तअपपम करून घ्या. हवे असल्यास त्या वर गाजर, बीट, कांदा किसून टाकू शकता . तसेच घरी असले ले शेंगदाणे चटणी, खोबरे चटणी टाकू शकता. तेल घालून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.
  4. आवडत्या चटणी सोबत खायला द्यावे.

My Tip:

मिनी तवा नसेल तर डोसा तवा वर बनवू शकता .

Reviews for Jowar flour uttapam Recipe in Marathi (0)