मिक्स पिठाची पौष्टिक गुळपापडी | HEALTHY gulpapdi Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • HEALTHY gulpapdi recipe in Marathi,मिक्स पिठाची पौष्टिक गुळपापडी, Minal Sardeshpande
मिक्स पिठाची पौष्टिक गुळपापडीby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

4

0

मिक्स पिठाची पौष्टिक गुळपापडी recipe

मिक्स पिठाची पौष्टिक गुळपापडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make HEALTHY gulpapdi Recipe in Marathi )

 • तीन वाट्या गहू
 • अर्धी वाटी पंढरपुरी( चिवड्यात वापरतो ते) डाळं
 • अर्धी वाटी मूग
 • एक वाटी तूप
 • अडीच वाट्या गूळ
 • अर्धी वाटी खसखस
 • अर्धी वाटी सुकं खोबरं किसून
 • अर्धी वाटी खारीक पावडर
 • बदाम 20
 • वेलची पावडर एक टीस्पून
 • एक वाटी पाणी
 • एक चमचा तूप पाका साठी

मिक्स पिठाची पौष्टिक गुळपापडी | How to make HEALTHY gulpapdi Recipe in Marathi

 1. गहू लाह्या फुटेपर्यंत भाजावेत.
 2. मूग खमंग भाजावेत.
 3. गहू, मूग आणि डाळं एकत्र करून रवाळ दळून आणावे.
 4. किसलेलं खोबरं खमंग भाजावे.
 5. खसखस भाजून मिक्सरला फिरवून घ्यावी.
 6. तयार पिठातील चार वाट्या पीठ कढईत घ्यावे.
 7. तूप घालून पाच मिनिटं गरम करावे.
 8. सगळी धान्य आधीच भाजल्याने परत फार भाजावे लागत नाही.
 9. बदामाचे कप करून घ्यावे.
 10. गरम पिठात खारीक पावडर, खसखस, भाजलेले खोबरे चुरून आणि बदाम काप थोडे सजावटीसाठी ठेवून बाकीचे मिक्स करावे.
 11. दुसऱ्या कढईत एक चमचा तूप घालून त्यात गूळ आणि एक वाटी पाणी घालून दोन तारी पाक करावा.
 12. वेलची पावडर घालावी.
 13. ताटाला तुपाचा हात लावावा.
 14. पाकात तयार पिठाचे मिश्रण मिक्स करून लगेच ताटावर थापावे. बदामाचे काप लावावे.
 15. आवडीनुसार वड्या पाडाव्या.

My Tip:

भाजलेलय गव्हाची गूळ पापडी जास्त खमंग लागते.

Reviews for HEALTHY gulpapdi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती